अमिर खानसोबत पार्टीत 'या' खास व्यक्तीला पाहून सगळ्यांना बसला धक्का

बॉलिवूड स्टार्सची प्रत्येक स्टाइल खास असते. 

Updated: May 26, 2022, 01:23 PM IST
अमिर खानसोबत पार्टीत 'या' खास व्यक्तीला पाहून सगळ्यांना बसला धक्का title=

मुंबई : बॉलिवूड स्टार्सची प्रत्येक स्टाइल खास असते. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या ग्रँड पार्टीमध्ये आमिर खानची एक्स पत्नी किरण रावसोबत पोहोचला होता. आमिर आणि किरणने या पार्टीत एकत्र प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. गेल्या वर्षी घटस्फोट घेतल्यानंतर आमिर आणि किरण एकमेकांपासून वेगळे झाले. यशराज स्टुडिओमध्ये आयोजित केलेल्या या पार्टीला आमिर खान आणि किरण राव यांच्याशिवाय बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. स्टार्ससह चमकणाऱ्या या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आमिर आणि किरणला एकत्र पाहिल्यानंतर अशा प्रतिक्रिया आल्या
करण जोहरच्या पार्टीदरम्यानचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमिर खानची एक्स पत्नी किरण रावसोबत पार्टीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. दोघं एकत्र उभे राहतात आणि फोटोसाठी पोज देतात. ज्या दरम्यान आमिर किरणच्या कमरेवर हात ठेवून पोज देताना दिसतो. पार्टीमध्ये, आमिर निळ्या रंगाच्या टी-शर्टसह नेव्ही ब्लू मखमली सूट परिधान केलेला दिसतोय. जो त्याने निळ्या डेनिम जीन्ससह परिधान केला होता.

त्याचबरोबर किरण राव यावेळी चमकदार चंदेरी ड्रेस परिधान करताना दिसली. किरण आणि आमिरला असं एकत्र पाहून युजर्स सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'ये रिश्ता क्या कहलाता है'. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, 'कन्फ्युज्ड इंडियन बॉलीवूड'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आमिर-किरण एकत्र काम करत आहेत
आमिर खान आणि किरण राव यांनी 15 वर्षांचं नाते संपुष्टात आणल्यानंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये वेगळं होण्याची घोषणा केली होती. 'लगान' चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरणची पहिली भेट झाली. घटस्फोटानंतरही दोघंही एकत्र काम करत आहेत. किरण राव आमिरच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातही सहनिर्माती आहे. 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर २९ मे रोजी लाँच होणार आहे. या चित्रपटात आमिर खान करीना कपूरसोबत दिसणार आहे.