ब्रेकअप ते पॅचअप ! Charu Asopa ने Video तून शेअर केला किस्सा

अखेर चारू असोपा हिने तिच्या ब्लॉगमधून (Blog) लग्नाला (marriage) संधी देण्याचा निर्णय का घेतला याबद्दल व्हिडीओ शेअर केला आहे. 

Updated: Sep 24, 2022, 11:01 AM IST
ब्रेकअप ते पॅचअप ! Charu Asopa ने  Video तून शेअर केला किस्सा  title=
actress charu asopa told truth behind rift husband rajeev sen on Social Media NM

Charu Asopa : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen) वहिनी आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा (TV actress Charu Asopa) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी चारु असोपा आणि सुष्मिताचा भाऊ राजीव सेन (Rajiv Sen) हे विभक्त होणार होते. हे ऐकून सर्वांना एकच धक्का बसला. सोशल मीडियावर (Social media) हे दोघे एकमेकांना टार्गेट करत होते. एवढंच नाही तर लॉकडाऊनमध्ये (Lockdown) हे दोघे वेगळे राहत होते अशी बातमीदेखील समोर आली होती. 

पण गणपतीच्या (Ganapati) दिवसात या दोघांनी आपल्या नात्याला दुसरी संधी (second chance for a relationship) देण्याचा निर्णय घेतला. अचानक या दोघांनी घेतलेल्या निर्णयानंतर चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली असं नेमकं झालं तरी काय, की त्यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर हे दोघे कधी सहलीवर तर कधी मुव्ही डेटवर जातांनाचे फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर करत होते. (actress charu asopa told truth behind rift husband rajeev sen on Social Media NM)

ब्रेकअप ते पॅचअप! (breakup to patchup)

अखेर चारू असोपा हिने तिच्या ब्लॉगमधून (Blog) लग्नाला (marriage) संधी देण्याचा निर्णय का घेतला याबद्दल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चारून त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. चारूने पुढे खुलासा केला की जेव्हा ती भीलवाडामध्ये (Bhilwara) होती तेव्हा तिने ठरवले होते की, ती मुंबईला (Mumbai) परत येईल आणि तिची मुलगी जियानासोबत (Gianna) एक नवीन प्रवास सुरू करेल.

न्यायालयीन कामकाजाच्या आदल्या रात्रीचा किस्सा

चारू असोपा यांनी सांगितले की, त्यांचा देव आणि दैवी शक्तीवर खूप विश्वास आहे. या शक्तीच्या वर काहीही नाही. आपल्या निर्णयाला दैवी हस्तक्षेप असल्याचं सांगून चारूने न्यायालयाच्या कामकाजाच्या आदल्या रात्री काय घडले ते सांगितलं. चारूने खुलासा केला की, ती 29 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईत पोहोचली होती आणि ती आणि राजीव 30 ऑगस्ट 2022 रोजी कौटुंबिक न्यायालयात (family court) जाणार होते.

ती म्हणाली की, कोर्टात जाण्याच्या आदल्या रात्री ती आणि राजीव एकत्र बसून काही विषयांवर बोलले. या संभाषणातून अनेक गैरसमज आणि तक्रारी दूर झाल्या. तिने पुढे सांगितले की, कदाचित बाप्पा यांना त्यांची मुलगी जियानाच्या फायद्यासाठी त्यांच्या नात्याला संधी द्यावी अशी इच्छा होती. यानंतर दोघांनी मुलगी जियानासोबतचा फॅमिली फोटो शेअर करत एकत्र राहण्याची घोषणा केली.