Shocking! नोरा फतेहीच्या कारला अपघात, पाहा घटनास्थळावरून कोणी काढला पळ

चर्चा तिच्या चाहत्यांना काहीशी चिंतेत टाकत आहे.   

Updated: Dec 23, 2021, 08:57 AM IST
Shocking! नोरा फतेहीच्या कारला अपघात, पाहा घटनास्थळावरून कोणी काढला पळ  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही ही तिच्या बोल्ड अंदाजासाठी, डान्स सीनसाठी कायमच चर्चेत असते. पण, आता नोराच्या नावाची  होणारी चर्चा तिच्या चाहत्यांना काहीशी चिंतेत टाकत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास नोरा एखा अपघाताला सामोरी गेली. नोराच्या कारला यावेळी अपघात झाला. 

सुदैवानं नोरा या कारमध्ये त्यावेळी उपस्थित नव्हती. फक्त तिचा कारचालकच यावेळी तिथं होता.

सुत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास हा अपघात झाला. 

ज्यावेळी नोराच्या कार चालकाकडून कारची एका ऑटो रिक्षाला धडक लागली. 

धडक झाल्यानंतर नोराची कार आणि रिक्षा दोन्ही वाहनांचं नुकसान झाल्याचं वृत्त समोर आलं. 

अपघातानंतर या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. ज्यानंतर नोराच्या कार चालकानं ऑटो चालकारा 1 हजार रुपये देत घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. 

संपूर्ण प्रकरणावर नोराची प्रतिक्रिया अद्यापही प्रतिक्षेत आहे. दरम्यान, सध्या नोरा तिच्या डान्स व्हिडीओसोबतच आणखी एका कारणामुळं चर्चेत आहे. 

महाठग सुकेश चंद्रशेखरशी आपल्या कथित संबंधांमुळं ती काहीशी अडचणीच येण्याची चिन्हं आहेत. नोराला सुकेशनं एक बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. 

असं असलं तरीही नोरा सरकारच्या वतीनं साक्ष देण्यात तयार असल्याचं म्हटलं जात आहे.