दिशा वाकाणीनंतर या ग्लॅमरस अभिनेत्रीला दया बेन पात्रासाठी विचारणा, पण नाकारली ऑफर

अशीच एक भूमिका म्हणजे 'दया बेन'... 

Updated: Jan 19, 2022, 04:20 PM IST
  दिशा वाकाणीनंतर या ग्लॅमरस अभिनेत्रीला दया बेन पात्रासाठी विचारणा, पण नाकारली ऑफर title=

मुंबई  : कॉमेडी टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आज घरोघरी लोकप्रिय आहे. या टीव्ही सिरीयलच्या लोकप्रियतेमागे एक साधी कथा आणि मालिकेत दाखवण्यात आलेल्या एकापेक्षा एक व्यक्तिरेखा आहेत.अशीच एक भूमिका म्हणजे 'दया बेन'... 

ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने आपली दमदार अभिनयाने घराघरात पोहोचवली. दिशाने साकारलेली दया बेनची ही भूमिका आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये, दया बेन ही जेठालालची पत्नी म्हणून दाखवण्यात आली आहे, मात्र, दया बेनची भूमिका साकारणारी दिशा वाकाणी बऱ्याच दिवसांपासून या मालिकेचा भाग नाही. दिशाने 2017 मध्ये ही मालिका सोडली, तेव्हापासून आजपर्यंत निर्मात्यांनी तिच्या जागी दया बेनच्या भूमिकेसाठी दुसरा कलाकार पाहिलेला नाही.

दरम्यान, दया बेनच्या भूमिकेसाठी टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला तारक मेहताच्या निर्मात्यांनी संपर्क साधला आहे आणि ती पुढील दया बेन बनू शकते अशी बातमी समोर आली होती.

मात्र, दिव्यांकाने स्वत: ही बातमी निराधार असल्याचे सांगितले आणि ती नवीन संकल्पना आणि नवीन आव्हाने स्वीकारण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. हे पात्र आधीच दुसऱ्या कलाकराने प्रस्थापित केले आहे, त्यामुळे ती त्याचा आनंद घेऊ शकणार नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याच वेळी, शोच्या निर्मात्यांनी सांगितले की, त्यांनी दिशा वकानीच्या परत येण्याची खूप दिवसांपासून वाट पाहिली आहे. अशा परिस्थितीत जर दिशा परत आली नाही तर नवीन दया बेनसोबत शो पुढे जाईल.

आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांना त्यांची नवीन दया बेन कधी मिळणार हे पाहावे लागेल. तसे, केवळ दिशा वकानीच नाही तर इतर अनेक स्टार्सनी देखील 2008 पासून सतत प्रसारित होणारी ही टीव्ही मालिका सोडली आहे. त्यापैकी एक नाव टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीचेही आहे.