वयाच्या 23 व्या अभिनेत्रीनं केली सर्जरी! ओठांजवळच्या तिळाचीच चर्चा, चाहतेही हैराण

Actress Did Surgery At The Of 23 : छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय अभिनेत्रीनं वयाच्या 23 व्या वर्षीच केली सर्जरी... त्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Aug 30, 2024, 10:47 AM IST
वयाच्या 23 व्या अभिनेत्रीनं केली सर्जरी! ओठांजवळच्या तिळाचीच चर्चा, चाहतेही हैराण title=
(Photo Credit : Social Media)

Actress Surgery At The Of 23 : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जन्नत झुबेर रहमानी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जन्नतनं बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 7 वर्षांची असताना तिनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि 9 वर्षांची होई पर्यंत जन्नत ही एक स्टार कलाकार झाली होती. जन्नतनं आजवर अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम केलं असून त्यामुळे ती चांगलीच चर्चेत असते. मात्र, आता तिचं चर्चेत येण्याचं कारण काही दुसरंच आहे. सध्या जन्नतचा बदललेला लूक हा चर्चेत आला आहे. त्यावरून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

सध्या जन्नत ही कुकिंग बेस्ड शो लाफ्टर शेफमध्ये दिसून येत आहे. मात्र, तिचा लूक हा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की जन्नतनं प्लास्टिक सर्जरी केली आहे. इतकंच नाही तर तिनं ओठाजवळ खोटी तीळ देखील लावून घेतली आहे, अशा अनेक गोष्टी नेटकरी बोलताना दिसत आहे. त्यावर आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एका नेटकऱ्यानं जन्नतचे फोटो शेअर केले होते. त्यात नो मेकअप लूकमध्ये जन्नत दिसली. तर दुसरीकडे ओठांजवळ एक तीळ दिसला. त्यावर नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की 'लहानपणी जन्नतच्या ओठांजवळ एक तीळ नव्हता. अशात मेकअप केल्यानंतर आता हा तीळ कसा दिसतोय.' फक्त इतकंच नाही तर अनेकांनी जन्नतनं नाकाची सर्जरी केल्याचं देखील म्हटलं आहे. 

नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट करत म्हटलं की बालकलाकारांमध्ये सर्जरीला घेऊन काय ऑब्सेशन आहे ते कळत नाही. जन्नतसोबत अवनीत देखील सुंदर दिसते. पण दोघांनी सर्जरी आणि बोटॉक्स करून चेहरा ठीक केला आहे.

हेही वाचा : हृतिक रोशन - सबा आझादचा ब्रेकअप! 12 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं नेमकं काय बिनसलं?

दरम्यान, जन्नतनं काल 29 जुलै रोजी तिला 23 वा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत इंडस्ट्रीतील अनेकांनी हजेरी लावली होती. त्यात तिची बेस्ट फ्रेंड शिवांगी जोशी देखील यावेळी दिसली. तर तिच्या या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड फैजल शेख देखील दिसला. जन्नतच्या कामाविषीय बोलायचे झाले तर तिनं ‘फुलवा’ आणि ‘तू आशिकी’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.