RBI Decesion: 5 रुपयांच्या नाण्यासंदर्भात मोठा निर्णय, ब्लॅक मार्केटमध्ये गैरवापर 'असा' की ऐकून डोकं चक्रावेल!

RBI Decesion on 5 rupees Coin : जेव्हा कधी एखाद नाणं किंवा नोट बंद करायची असेल तेव्हा आरबीआयने केंद्र सरकारसमोर नोटा आणि नाण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवते. 

प्रविण दाभोळकर | Updated: Dec 16, 2024, 05:16 PM IST
RBI Decesion: 5 रुपयांच्या नाण्यासंदर्भात मोठा निर्णय, ब्लॅक मार्केटमध्ये गैरवापर 'असा' की ऐकून डोकं चक्रावेल!
5 रुपयांचं नाणं

RBI Decesion : दैनंदिन व्यवहारातून 5 रुपयांची नाणी बंद झाली अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे अनेकदा दुकानदार 5 रुपयांची नाणी स्वीकाराला नकार देतात. देशात चलनात असलेली नवीन नाणी आणि नोटा छापण्याचा अधिकार आरबीआयला असतो. त्यामुळे नाणी, नोटा सुरु करण्याचा, बंद करण्याचा, त्यात बदल करण्याचे महत्वाचे निर्णय आरबीआय घेत असते. आरबीआयने खरंच 5 रुपयाच्या नाण्यासंदर्भात काही निर्णय घेतला आहे का? घेतला असेल तर का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  

Add Zee News as a Preferred Source

जेव्हा कधी एखाद नाणं किंवा नोट बंद करायची असेल तेव्हा आरबीआयने केंद्र सरकारसमोर नोटा आणि नाण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवते. त्यानंतर ही प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण होते. यानंतर केंद्र सरकार आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि अर्थतज्ज्ञांच्या मदतीने निर्णय घेतात. नाणी आणि नोटा छापण्याचे अधिकार आरबीआयला दिले जातात. जेव्हा कोणतीही नोट किंवा नाणे सील करावे लागते तेव्हा अशीच पद्धत अवलंबली जाते. आत्तापर्यंत देशात अनेक वेळा नाणी आणि नोटा चलनात आल्याचे दिसून आले आहे. 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँकेने 5 रुपयांच्या नाण्याबाबतही मोठा निर्णय घेतला आहे.

5 रुपयांची नाणी बंद झाली आहेत का?

नोटांसोबतच भारतीय चलनात नेहमीच नाणी वापरली गेली आहेत. 100 रुपये, 200 रुपये आणि 500 ​​रुपयांच्या नोटांसोबतच 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी अजूनही चलनात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत 5 रुपयांची नाणी बाजारातून गायब होत असल्याचे दिसून येत आहे. आपण सर्वांनी पाच रुपयांचे नाणे वापरले आहे. 5 रुपयाचे नाणे इतर नाण्यांपेक्षा जाड असते. मात्र आता ही नाणी हळूहळू गायब होत असून त्यांची जागा 5 रुपयांच्या पातळ सोन्याच्या नाण्याने घेतली आहेत.जर 5 रुपयांच्या नाण्याचे वजन 9 ग्रॅमपेक्षा जास्त असेल तर RBI त्याची छपाई कमी करते किंवा थांबवते. आता तीच जुनी नाणी बाजारात दिसू लागली आहेत जी सतत फिरत असतात. याशिवाय सोन्याची पातळ नाणी सर्वत्र दिसतात. पण असे का झाले आणि RBI ने जुन्या नाण्यांचे विमुद्रीकरण का केले हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर या मागचे कारण जाणून घेऊया.

RBI ने जुनी नाणी का बंद केली?

5 रुपयांची जाडी हेच नाणी बंद करण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. नाण्याच्या उत्पादनात वापरण्यात येणारा धातू वितळवून चार ते पाच ब्लेड बनवता येतात. ज्यांची किंमत ५ रुपयांपेक्षा जास्त असते. या आर्थिक कारणामुळे सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने ही पाच रुपयांची नाणी बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. आरबीआयच्या नियमानुसार चलनाची किंमत त्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा जास्त असल्यास, ती नाणी किंवा नोटा चलनातून काढून टाकली जातात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने 5 ब्लेड बनवण्यासाठी 5 रुपयांचे नाणे वितळवले आणि नंतर ते 2 रुपये प्रति ब्लेडने विकलेतर नाण्यातील धातूचे आंतरिक मूल्य त्याच्या आर्थिक मूल्यापेक्षा जास्त आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे RBI ने जाड पाच रुपयांच्या नाण्यांसारखी इतर काही नाण्यांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More