भारतातील या राज्याला म्हणतात स्लिपिंग स्टेट, काय आहे यात खास?

Sleeping State Of India: आज आपण भारतातील अशा राज्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला भारताचे स्लिपिंग स्टेट म्हणून ओळखले जाते. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 16, 2024, 06:41 PM IST
भारतातील या राज्याला म्हणतात स्लिपिंग स्टेट, काय आहे यात खास? title=
हिमाचल प्रदेश

Sleeping State Of India: भारतातील प्रत्येक शहर, प्रत्येक राज्य त्याच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. प्रत्येक राज्याचा स्वतःचा काही वारसा आणि इतिहास असतो. काही राज्ये धर्माचे शहर म्हणून ओळखली जातात, तर काही राज्ये उद्योगांसाठी ओळखली जातात. काही राज्यांना शिक्षणाचे केंद्र मानले जाते, तर इतर अनेक धार्मिक स्थळांसाठी ओळखले जातात. प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. हे सर्वकाही पाहण्यासाठी जगभरातील लोकं भारतात येत असतात. आज आपण भारतातील अशा राज्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला भारताचे स्लिपिंग स्टेट म्हणून ओळखले जाते. इथली परंपरा, भाषा, खाण्याच्या सवयी इतर राज्यांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. असे कोणते राज्य आहे? जाणून घेऊया. 

हिमाचल प्रदेश

स्लिपिंग स्टेट ऑफ इंडिया म्हटल्या जाणाऱ्या या राज्याचे नाव हिमाचल प्रदेश आहे. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत, जिथे केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येतात. हे राज्य पर्वतांच्या कुशीत वसलेले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिरवीगार जंगले, नद्या, तलाव आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. यामुळेच हिमाचल प्रदेश हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाणांपैकी एक आहे. 

स्लीपिंग स्टेट ऑफ इंडिया

ज्याप्रमाणे प्रत्येक शहराची स्वतःची खासियत असते, त्याचप्रमाणे भारताचे स्लीपिंग स्टेट हे त्याच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. भारतात मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये लोकं सतत काही ना काही कामात असतात. लोकांची धावपळ सुरु असते. पण तुम्ही कधी हिमाचल प्रदेशमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला शांततापूर्ण वातावरण अनुभवायला मिळेल. येथील जीवनशैली खूप साधी आहे. यामुळेच हे राज्य भारताचे झोपेचे राज्य म्हणूनही ओळखले जाते. असे असताना पूर्वी या राज्याला त्रिगर्त असेही म्हटले जात होते. हिमाचल प्रदेशमधून रावी, व्यास आणि सतलज नद्या वाहतात. या नद्यांच्या नावानेच हिमाचलला ओळखले जात होते. परंतु नंतर त्याचे नाव बदलण्यात आले.

एकदा तरी नक्की एक्सप्लोर करा

हिमाचलला 1971 मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. हे जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या चार राज्यांनी वेढलेले आहे. तसेच तिबेटची सीमा आहे. जर तुम्हाला हे राज्य एक्सप्लोर करायचे असेल तर तुम्ही शिमला, मनाली, धर्मशाला, डलहौसी, कसाल आणि मलाना येथे जाऊ शकता. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. पर्यटकांसाठी हे नेहमीच सर्वोत्तम ठिकाण राहिले आहे.