वयाच्या 49 व्या वर्षी अभिनेत्री काजोल होणार आई? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आपल्या जबरदस्त अभिनयाने अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र यावेळी अभिनेत्रीचा असा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालादेखील आश्चर्याचा धक्का बसेल.

Updated: Oct 30, 2023, 11:53 AM IST
वयाच्या 49 व्या वर्षी अभिनेत्री काजोल होणार आई? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Kajol Devgan Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री काजोल खूप लोकप्रिय आहे. ही अभिनेत्री तिच्या स्पष्टवक्ता शैलीसाठी ओळखली जाते. आपल्या जबरदस्त अभिनयाने अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र यावेळी अभिनेत्रीचा असा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून युजर्सच्या ट्रोलिंगचा अभिनेत्रीला सामना करावा लागत आहे. लोकांना ना तिची स्टाइल आवडली ना त्याचा ड्रेसिंग सेन्स. नुकतीच अभिनेत्री एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती, जिथे तिला पापाराझींनी स्पॉट केलं. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. तिच्या चालण्यामुळे आणि तिच्या वागण्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल केले जात आहे. तर अनेकांनी तिचा हा लूक पाहून ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधला आहे.

Add Zee News as a Preferred Source

अलीकडेच काजोलने ओटीटी प्ले अवॉर्ड्सला हजेरी लावली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा टाइट ड्रेस घातला होता. यासोबतच तिने केसांमध्ये एक्स्टेंशनही लावलं होतं.  बोल्ड लूकमध्ये अभिनेत्री कूपच सुंदर दिसत होती, मात्र त्याहीपेक्षा ती अनकम्फर्टेबल दिसत होती. तिच्या या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मग काय, लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली. वास्तविक, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री विचित्र एक्सप्रेशन देत आहे.  व्हिडिओ पाहिल्यानंतर  ती तिच्या घट्ट बॉडीकॉन आउटफिटमुळे त्रास्त असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

याशिवाय आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अभिनेत्री पोझ देण्यापूर्वी धडपडताना दिसत आहे आणि हा व्हिडिओ पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही जण तिला जाड झालीस म्हणत ट्रोल करत आहेत. तर अनेकजण तिच्या ड्रेसवर कमेंट करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी तर मर्यादा ओलांडून अभिनेत्री प्रेग्नंट आहे सका, असा सवाल केला आहे. एका युजर्सने कमेंट करत लिहिलं आहे की, 'तू खूप घट्ट ड्रेस  का घातला आहेस?' तर दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट करत लिहिलं आहे की, 'तिने इतका टाइट ड्रेस घातला आहे की तिचं पोट दिसत आहे.' तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, प्रेग्नंट आहेस का?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सिनेमांमध्ये झळकली आहे काजोल
काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, कामाबद्दल बोलायचे झालं तर, काजोल शेवटची कोर्टरूम ड्रामा 'द ट्रायल'मध्ये दिसली होती.  यामध्ये अभिनेत्रीच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं होतं. यापूर्वी ही अभिनेत्री 'सलाम वेंकी' चित्रपटात दिसली होती. काजोल आणि विशाल जेठवा स्टारर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिर खानही छोट्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता लवकरच ही अभिनेत्री 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये दिसणार आहे.

About the Author