Arbaaz Khan And Sohail Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘बिग बॉस 17’ या शोमुळे चर्चेत आहे. हा शो चांगलाच चर्चेत असतो. वेगवेगळ्या गोष्टी या शोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेंड का वारची प्रेक्षक नेहमीच प्रतिक्षा करताना दिसतात. यंदाच्या रविवारच्या शोमध्ये सलमानशिवाय त्याचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांनी हजेरी लावली होती. खान ब्रदर्स बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसोबत मस्ती मज्जा करताना दिसतात.
खरंतर 'बिग बॉस 17' अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघे हे त्यांचं इंन्ट्रोडक्शन देताना दिसले. त्याशिवाय ते बोलतात की इथे आम्ही तुमच्या विरोधात खटला दाखल करायला आलो आहेत. जर तुम्ही काही पुरावे देऊ शकला नाहीत तर तुम्हाला धक्का बसेल. यानंतर खान ब्रदर्स कपल्ससोबत मस्ती करताना दिसतात. सोहेल विचारतो की 'इथे सगळ्यात मातब्बर स्पर्धक कोण आहे? त्यावर अरबाज बोलतो की मातब्बर नाही, पण एक असा एक खेळाडू आहे जो बांधलेला आहे. ज्याचं नाव नील आहे. ऐश्वर्या नीलनं सगळयांना बांधलेलं आहे. यानंतर दोघं भाऊ, अंकिता आणि विकीची देखील खिल्ली उडवताना दिसतात. यानंतर सोहेल बोलतो की पती-पत्नीची भांडणं सोडवण्यासाठी आमच्याकडे एक टीप आहे. उत्तर देत अरबाज हसत बोलतो की आमच्या दोघांकडे? यावर सोहेल बोलतो की आमचं जे करंट स्टेटस आहे, त्या हिशोबानं आम्ही काही टिप्स द्यायला नको.'
रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जात आहे की आता अरबाज खान आणि सोहेल खान प्रत्येक रविवारी सलमानच्या जागी होस्ट करणार आहेत. खरंतर शोचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात अरबाज सोहलला बोलतो की या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं आहे की जर आम्ही हा शो साईन केला तर आणखी कोणता शो आपण साइन करू शकणार नाही. यावर सोहेल बोलतो की हा, इतर चॅनल्ससाठी आपण खूप शो केले आहेत, साइन तर करू पण आपण काय करतोय. तर अरबाज बोलतो की अरे आपण बिग बॉस होस्ट करतोय. त्यानंतर सलमान खानची एन्ट्री होते आणि बोलतो की तो शुक्रवार-शनिवार होस्ट करेल आणि रविवारी अरबाज-सोहेल रोस्ट करतील.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.