मुंबई : नवाब सैफ आणि बेगम करीना यांचा चिमुरडा तैमूर फोटो मीडियाने घेतले तर अभिनेत्री करीना कपूरला काहीच हरकत नसल्याचं तिचं म्हणणं आहे. यावेळीच तिनं साराच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दलही भाष्य केलं.
मला वाटते वेळ आता बदलत आहे. आम्ही जिथेही जातो तिथे आमचे फोटो काढले जातात. हा आमच्या सामान्य जीवनाचा एक भाग आहे. जितकं शक्य होईल तितकं मी 'तैमूर'चा संभाळ करते... त्याच्याबरोबर वेगळं वागण्याची गरजचं पडत नाही. त्यामुळेच मीडियाने त्याचे फोटो घेतले तरी मला काही हरकत नाही. माझा तैमूर खूप गोंडस बाळ आहे, असं करीनानं म्हटलंय. आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांच्या 'प्रेग्नेंसी नोट्स : बिफोर, ड्युरिंग अॅन्ड अाफ्टर' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ती बोलत होती.
करीनाला जेव्हा तिच्या वाढलेल्या वजनाबद्दल दबाव जाणवत नाही का? असा प्रश्न विचारला गेला... तेव्हा ती नाही म्हणाली, मी जिमला जाते आणि योग्य आहार घेते. त्यामुळे मला चांगलं वाटतं. यामुळे माझं वजन कमी होण्यास मदत होईल... पण, याला वेळ तर लागेलच... मुलाला सोडून मी जिमला जाते. परंतु जर मी सामान्य जीवन जगू शकले नाही तर तो मूर्खपणा ठरेल... एक आनंदी आई ही जगातील सर्वोत्तम आई असते, असं करीनाचं म्हणणं आहे.
सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिला काही टिप्स देणार का? यावर करीना म्हणते की, तिला काही टिप्सची गरज नाही. अभिनय हे तिच्या नसानसांत भिनलेलं आहे. तसंच तिची सुंदरता आणि प्रतिभा लवकरच आपल्याला चित्रपटात दिसणार आहे.
सारा अली खान बॉलिवूडमध्ये तिच्या पदार्पणात सळ्यांवर भूरळ पाडू शकेल, असा विश्वास करीनानं व्यक्त केलाय. सारा आपल्या डेब्यु चित्रपटात सुशांत सिंग राजपूतबरोबर काम करणार आहे.