ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे.

Updated: Nov 21, 2021, 11:19 PM IST
ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन title=

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन झालं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा यासारख्या लोकप्रिय नाटकांप्रमाणेच मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकां त्यांनी गाजवल्या. कोरोनामुळे त्यांनी प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या मागे पती आणि विवाहित कन्या असे कुटूंब आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर घनचक्कर या चित्रपटात माधवी गोगटे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. गेला माधव कुणीकडे हे त्यांनी अभिनेता प्रशांत दामलेंबरोबर केलेले नाटक खूप गाजलं होतं.

ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

माधवी यांनी मराठी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या गाजलेल्या नाटकांबरोबरच, अंदाज आपला आपला अशा काही नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. माधवी यांची दंगल टीव्हीवर 'सिंदूर की किमत' ही मालिका सुरू होती. ही मालिका त्या सोडणार अशी चर्चा रंगलेली होती.

स्टार प्लसवरील अनुपमा या मालिकेत अनुपमाच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त करत आहे.