''नवराई माझी लाडाची...'' गाण्यावर निवेदिता सराफ यांचा तूफान डान्स; VIDEO मिनिटांत व्हायरल

Nivedita Saraf Dance Video: लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका डान्स व्हिडीओ व्हायरल केला आहे. सध्या त्यांच्या या व्हिडीओनं सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर तूफान कमेंट्सही आल्या आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 7, 2023, 04:21 PM IST
''नवराई माझी लाडाची...'' गाण्यावर निवेदिता सराफ यांचा तूफान डान्स; VIDEO मिनिटांत व्हायरल  title=
July 7, 2023 | nivedita saraf dance video on song navrai mazi ladachi ladachi g goes viral on instagram (Photo: Nivedita Saraf | Instagram)

Nivedita Saraf Dance Video: अभिनेत्री निवेदिता सराफ या कायमच चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहेत. निवेदिता या अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या आपले नानाविध पोस्टही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यांचे स्वत:चे युट्यूब चॅनलदेखील आहे. त्या नवीन पदार्थही शेअर करताना दिसतात. इन्टाग्रामवरही त्या सक्रिय आहेत. सध्या अनेक सेलिब्रेटी हे इन्टाग्रामवर रील्स शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या रिल्सची सर्वत्र चर्चा होताना दिसते. त्यांच्या या रील्सना प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो. सध्या निवेदिता सराफ यांनीही सध्या एक रील इन्टाग्रामवर शेअर केलं आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की त्यांनी एका लोकप्रिय गाण्यावर तूफान डान्स केला आहे तोही परदेशात! 

काही दिवसांपुर्वी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. सध्या ते दोघंही आपलं नाटक 'व्हॅक्यूम क्लिनर'च्या निमित्तानं परदेशात आहे असे कळते आहे. तेव्हा त्यावेळी तिथून त्यांनी हा व्हीडिओ पोस्ट केला आहे. या  नाटकात अभिनेते अशोक सराफ प्रमुख भुमिकेत आहेत तर निवेदिता सराफ यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. यावेळी त्यांनी मराठमोळ्या गाण्यावर ताल धरला आहे. श्रीदेवीच्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटातील 'नवराई माझी लाडाची लाडाची गं' या गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. सोबतचं त्यांच्या नृत्यकौशल्याचे चाहत्यांनी कौतुकही केले आहे. यावेळी निवेदिता सराफ यांनी हा डान्स महिलांच्या ग्रुपसोबत केला आहे. 

हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक

एका युझरनं लिहिलंय की, 'एकाच घरात इतक्या अप्सरा' तर अनेकांनी 'Superb Dance', 'Awesome' अशा कमेंट्स केल्या आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. आत्तापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि खूप लाईक्सही या व्हिडीओवर चाहत्यांचे आले आहेत. सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून त्याअगोदर त्यांना ‘अग्गबाई सासूबाई’, ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेतून अफाट लोकप्रियता मिळाली होती. त्याचसोबत त्यांनी ‘सपनों से भरे नैना’, ‘ये जो है जिंदगी’, ‘केसरी नंदन’ या हिंदी मालिकांतूनही कामं केली आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपुर्वी त्यांची एक पोस्टही व्हायरल झाली होती. ज्यात त्यांनी एका मॉलमध्ये आपल्याला विक्रेत्यांकडून आलेल्या चुकीच्या वर्तनाचा त्रास झाला होता. सध्या असे अनुभव हे सामान्य ग्राहकांनाही येताना दिसत आहेत.