जेव्हा अर्जुनच्या प्रेमात धुंद मलायका पोहोचली बहिणीच्या घरी, अपेक्षाही नव्हती की...

मलायका किंवा अर्जुन यांच्यापैकी कोणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही

Updated: Jan 12, 2022, 06:13 PM IST
जेव्हा अर्जुनच्या प्रेमात धुंद मलायका पोहोचली बहिणीच्या घरी, अपेक्षाही नव्हती की... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याला सध्या अनपेक्षित वळण मिळालं आहे. एकाएकी त्यांच्या नात्यामध्ये वादळ आल्याची माहिती समोर येत असून, त्यांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर आलं. (Arjun Kapoor Malaika Arora)

अद्यापही मलायका किंवा अर्जुन यांच्यापैकी कोणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळं सध्या कोणतेही तर्क लावणं चुकीचं असेल. 

अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चा याआधीही झाल्या. पण, प्रत्येक वेळी या जोडीनं या चर्चा उधळून लावल्या. 

कायमच मोठ्या ताकदीनं सर्वांसमोर येणारी ही जोडी जास्त लक्ष तेव्हा वेधून गेली ज्यावेळी ते दोघंही मलायकाच्या बहिणीच्या घरी पोहोचले. 

अमृता अरोरा या मलायचाच्या बहिणीच्या घरी यावेळी तिचे आईवडिलही उपस्थित होते. इतकंच नव्हे तर तिचा मुलगा अरहानही तिथेच होता. 

मलायकानं त्यावेळी अर्जुनला तिथे आणणं अनपेक्षित होतं. पण, याचवेळी तिच्या नात्याचे बंध सर्वांनाच पाहता आले. ती खऱ्या अर्थानं अर्जुनच्या प्रेमात धुंद होती.

मलायकानं यावेळी शर्ट ड्रेसला प्राधान्य दिलं होतं. अतिशय कॅज्युअल लूकमध्ये तिनं सर्वांची मनं जिंकली. 

निमित्त काहीही असो, फॅशनच्या बाबतीत मलायका कुठंही चुकली नाही हेच तिनं यावेळी दाखवून दिलं होतं. 

दरम्यान, सध्या मात्र ही ब्युटीक्वीन एकटीच राहण्याला प्राधान्य देत आहे. पण, याचा अर्थ खरंच अर्जुनसोबतच्या तिच्या नात्याला तडा गेलाय असा होतो का? 

या प्रश्नाचं उत्तर आता फक्त मलायका किंवा अर्जुनच देऊ शकणार आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x