'मन' फेम मनीषा कोइरालाचं बदलतं रूप; आता अशी दिसते आमिर खानची 'प्रिया'

सध्या सोशल मीडियावर मनीषाचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 

Updated: Sep 29, 2021, 02:20 PM IST
'मन' फेम मनीषा कोइरालाचं बदलतं रूप; आता अशी दिसते आमिर खानची 'प्रिया' title=

मुंबई : सुभाष घाई दिग्दर्शित 'सैदागर' चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करियरला सुरूवात करणारी अभिनेत्री म्हणजे मनीषा कोइराला. 'सैदागर' चित्रपटाच्या माध्यमातून मनीषाला तुफान  लोकप्रियता मिळाली. पहिल्याचं चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. त्यानंतर संजय लिला भंसाळी यांच्या 'खामोशी' चित्रपटाने तिला टॉप अभिनेत्रीच्या यादीत जागा मिळवून दिली. मनिषा कायम तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असायची. मनीषा कोइराला एक दोन नव्हे तर तब्बल 12 जणांसोबत रिलेशनमध्ये होती. 

प्रत्येक रिलेशनशिपमध्ये तिला अपयश मिळालं. अखेर मनीषाने नेपाळचे उद्योगपती सम्राट दहालसोबत केलं. 19 जून 2010 साली त्यांनी लग्न केलं. त्यानंतर 2 वर्षांनंतर 2012 रोजी दोघे विभक्त झाले. तेव्हा सर्वांना आपल्या अभिनयाने आणि लूकने घायाळ करणारी अभिनेत्री  मनीषा आता अत्यंत वेगळी दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. जेव्हा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तेव्हा चाहते तिचे फोटो पाहून आश्चर्यचकित झाले. अशा परिस्थितीत, आता मनीषाचे काही फोटो समोर आले आहेत, फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना विश्वास बसत नाही की ही तीच नेपाळी अभिनेत्री आहे.

मनीषा कोईराला 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मनीषाने 'मन', 'दिल से', 'बॉम्बे', 'अकेले हम अकेले तु'म यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मन या चित्रपटातील तिची 'प्रिया' ही भूमिका चाहत्यांना खूप आवडली. यामध्ये ती आमिर खानसोबत दिसली होती.