फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलंत का? लग्नानंतर सासूनं घरातून केलं होतं बेदखल; आज जगतेय असं आयुष्य

Nafisa Ali News: सोशल मीडियावर अनेक अभिनेत्रींच्या लहानपणीचे फोटो हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची फारच चर्चा रंगताना दिसते. आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्रीची. त्यामुळे सध्या या अभिनेत्रीचीच चर्चा आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 18, 2023, 06:03 PM IST
फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलंत का? लग्नानंतर सासूनं घरातून केलं होतं बेदखल; आज जगतेय असं आयुष्य title=
July 18, 2023 | actress nafisa ali who once known for her popular roles is now out of the bollywood industry (Photo: Zee News)

Nafisa Ali News: सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटींच्या फोटोंची. आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना आपण काही कधी त्यांच्या लहानपणी पाहिलं नाही. त्यामुळे त्यांची सर्वात जास्त चर्चा असते ती म्हणजे त्यांच्या लहानपणीच्या फोटोंची. सोशल मीडियावर अशाप्रकारे अनेक सेलिब्रेटींच्या लहानपणीच्या फोटोंची चर्चा असते. कधी दीपिका पादूकोणच्या लहानपणीचा फोटो तर कधी रणबीर कपूरचा तर कधी आधी दुसऱ्या कोणाचा. त्यामुळे त्यांच्या फोटोंबद्दल सोशल मीडियावर चर्चा असते. आता सध्या अशाच एका दिग्गज अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यावेळी या अभिनेत्रीला ओळखणंही फार कठीण झालं आहे. त्यामुळे तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

या अभिनेत्रीला तुम्हाला ओळखणंही कदाचित कठीण जाईल. परंतु ज्याप्रमाणे तिचा गोरा रंग, घारे डोळे, सतेज कांतीचे रूप दिसते आहे त्यावरून ही अभिनेत्री तुम्हाला कोणीतरी बॉलिवूडची अभिनेत्री आहे की काय असंही वाटू शकते. परंतु नाही ही एक बॉलिवूडची अभिनेत्री आहे जिचं नावं आहे. नफिसा अली. नसिफा अली या 70-80 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आज त्या बॉलिवूडपासून दूर गेल्या असल्या तरीसुद्धा त्यांच्या अनेक चित्रपटांमुळे त्या आजही चर्चेत आहेत. मध्यंतरी एका जीवघेण्या आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्या करिअरला मोठा ब्रेक लागला होता. त्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांनी लवकरच बरं व्हावं म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. Life in a Metro या चित्रपटातून त्या आपल्यासमोर आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी करिअरमधून पुरता ब्रेक घेतला होता. 

हेही वाचा - फोटोशॉप लपून राहत नाही; जान्हवी कपूरचा 'तो' फोटो आहे त्याचा पुरावा? सोशल मीडियावर ट्रोल!

नफिसा अली यांनी 'मेजर साहब' या चित्रपटातून सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन यांच्या पत्नीचा ऑनस्क्रीन रोल केला होता. त्याचसोबत त्यांनी मिस इंडिया ही स्पर्धाही जिंकली होती. 2007 साली आलेल्या Life in a Metro या चित्रपटातून काम केले होते. ज्यात त्यांची आणि धर्मेंद्र यांची ऑनस्क्रीन रॉमेण्टिक केमेस्ट्री दाखविली होती. उतारवयातच त्या दोघांनी आपली प्रेम कहाणी या चित्रपटातून समोर आणली होती. त्यामुळे या फिल्ममध्ये त्यांचा किसिंग सीन होता. ज्याची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांनी दुसऱ्या धर्माच्या पुरूषासह लग्न केले जो एक आर्मी ऑफिसर होतो परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार मात्र त्यांच्या सासूबाईंना त्यांना घरातून काढून टाकले होते आणि त्यांना कधीही स्विकारलेले नव्हते. मिस वर्ल्डसोबतच त्यांनी अनेक स्विमिंग स्पर्धा जिंकल्या आहेत.