Good News शेअर करणाऱ्या अभिनेत्रीचा बोल्ड लूक एकटक पाहयात नेटकरी

या सर्व भवाना एकवटत वयाच्या 41 व्या वर्षी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं Good News दिली आहे.   

Updated: May 10, 2022, 04:33 PM IST
Good News शेअर करणाऱ्या अभिनेत्रीचा बोल्ड लूक एकटक पाहयात नेटकरी title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : गरोदरपणाची चाहूल लागल्यानंतर पुढचा प्रत्येक क्षण कोणत्याही महिलेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच नवे अनुभव देणारा ठरतो. आपल्या उदरात एक नवा जीव जन्माला येत असल्याचं सुख सर्वात अतुलनीय असतं असेच भाव गरोदर महिलेच्या मनात असतात. या सर्व भवाना एकवटत वयाच्या 41 व्या वर्षी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं Good News दिली आहे. 

आपल्या बोल्डनेससाठीच ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीनं एक सुरेख पोस्ट लिहित, गरोदरपणातील फोटो सर्वांसाठीच शेअर केले आहेत. (Namitha pregnancy)

दाक्षिणात्य कलाजगत गाजवणारी ही अभिनेत्री आहे, नमिता. आनंद पोटात माझ्या माईना... अशाच भावनेसह नमितानं एख पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती काळ्या रंगाच्या स्किनी आऊटफिटमध्ये दिसत आहे. 

न्यूड मेकअप आणि तरीही खुलून आलेलं सौंदर्य, गरोदरपणातील नूर अंकिताच्या चेहऱ्याला आणखी उठावदार करताना दिसत आहे. 

आपल्या गरोदरपणाचा आनंद शेअर करताना नमितानं लिहिलं, 'मातृत्त्वं... जेव्हा हा नवा अध्याय सुरु झाला तेव्हा मी बदलले, काहीतरी माझ्यात आलं.... अगदी अलगद, हळुवारपणे.... ' असं लिहित बाळाची हालचाल आपल्याला किती सुखद अनुभव देणारी ठरते असंही तिनं लिहिलं. 

बाळामुळं आजवर आपण नव्या अस्तित्वाला सामोरं जात असल्याची भावनाही तिनं व्यक्त केली. गरोदरपणा एखाद्या स्त्रीला किती बदलतो हेच यावेळी पाहायला मिळालं. 

2022 मध्ये दाक्षिणात्य कलाजगतामध्ये नमितानं पदार्पण केलं होतं. अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. पण, महत्त्वाच्या भूमिकांपासून मात्र ती दूर राहिली. स्क्रीनवर सतत तिला बोल्ड आणि इंटिमेट दृश्यच ऑफर करण्यात आली. 

नमिता तिच्या खासगी आयुष्यामुळंही चर्चेत होती. 2017 मध्ये तिनं वीरेंद्र चौधरी यांच्याशी लग्नगाठ बांधली. ज्यानंतर आता 5 वर्षांनंतर ती आई होण्यासाठी सज्ज आहे.