बायकोनेच केला प्रसिद्ध साऊथ इंडियन स्टारचा 'तो' लुक व्हायरल... चर्चांना उधाण

 त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

Updated: Aug 21, 2022, 02:48 PM IST
 बायकोनेच केला प्रसिद्ध साऊथ इंडियन स्टारचा 'तो' लुक व्हायरल... चर्चांना उधाण title=

Mahesh Babu Photo Goes Viral: महेश बाबू हा नाव साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील एक मोठे नावं आहे. महेश बाबूचे एकाहून एक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. महेश बाबू सतत कुठल्या ना कुठल्यातरी चर्चेत असतातच परंतु सध्या त्यांच्या एका व्हायरल झालेल्या फोटोने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. 

महेश बाबू यांची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने नुकताच एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोत महेश बाबू चक्क शर्टलेस लुकमध्ये दिसत आहेत. स्विमिंगपूलमध्ये ते शर्टलेस लुकमध्ये आहेत. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

महेशबाबूंनी दाखवली बॉडी... 
महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांचे दोन फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये महेश बाबू बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहेत. महेश बाबू स्विमिंग पूलमध्ये शर्टलेस उभा आहे. पहिल्या फोटोत तो गोगल लावतोय तर दुसऱ्या फोटोत तो पोहायला जाताना दिसतो आहे. हे फोटो शेअर करताना नम्रताने कॅप्शनमध्ये  #toocoolforthepool असा हॅशटॅग टाकला आहे. 

हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत त्यावर चाहत्यांनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. युझर्सनी चांगल्या आणि वाईट दोन्ही कमेंट्स केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिग्दर्शक त्रिवेकराम यांच्या चित्रपटासाठी महेश बाबू लवकरच शुटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटात महेश बाबू आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा रोमान्स पाहायला मिळणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे नाव फायनल झालेले नाही. महेश बाबू लवकरच बॉलीवूडमध्येही पदार्पण करण्याची शक्यता आहे. ‘SSMB28’ या त्यांच्या चित्रपटाचे शुटिंग त्यांनी नुकतेच पुर्ण केल्याची बातमी समोर आली आहे.