नोराच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, अभिनेत्री कोरोना पॉझिटीव्ह

नुकतच नोराचं 'नाच मेरी रानी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.

Updated: Dec 30, 2021, 02:27 PM IST
नोराच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, अभिनेत्री कोरोना पॉझिटीव्ह title=

मुंबई : कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीला कोरोनाने विणलं आहे. बरेच सिनेस्टार कोरोनाच्या जाळ्यात सापडत आहेत. करिना कपूर खान आणि अर्जून कपूरसारखे मोठे सेलेब्सनंतर आता अभिनेत्री नोरा फतेही कोरोना पॉझिटीव्ह आली आहे.

नोरा फतेहीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह
नोरा फतेही २८ डिसेंबरला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. सध्या नोरा कोरोनाच्या नियमांचं पालन करत आहे. डॉक्टरांच्या देखरेखेखाली सध्या नोरा उपचार घेत आहे.  नोराने इंस्टाग्रामवर या संदर्भातली माहिती शेअर केली आहे. याचबरोबर तिने तिच्या चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे.

नुकतच नोराचं 'नाच मेरी रानी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्यात नोराचा जबरदस्त डान्स आपल्याला पाहायला मिळाला होता. गुरु रांधवाचं हे गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. नोराआधी बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर करिना कपूर, शिल्पा शिरोडकरदेखील कोरोना पॉझिटीव्ह आले होते. बॉलिवूडचे बरेच सेलिब्रिटी कोरोनाच्या जाळ्यात सापडत आहेत.