मुंबई : फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे वादात फसल्याचं दिसून येतं. काही सेलिब्रिटी वादात अडकून प्रसिद्धी मिळवतात, तर काही जण उभं केलेलं स्वत:चं करिअर संपवून टाकतात. असाच काहीसा प्रकार एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत घडला आहे. ज्याची बरीच चर्चा झाली.
या अभिनेत्रीने वादात पडून आपलं अभिनय क्षेत्रातील करिअर संपवलं. बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख बनवल्यानंतर या अभिनेत्रीला वादात फसल्यामुळे बराच त्रास सहन करावा लागला. ती अभिनेत्री म्हणजे अलीशा खान.
अलीशा खानचं करिअर
उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये राहणाऱ्या अलीशा खानने आपलं करिअर मॉडेलिंग क्षेत्रातून सुरु केलं. सलग 12 सुपरहिट म्युझिक व्हिडिओ करत तिने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर यायला सुरुवात झाली.
अलीशाने 2010 मध्ये माय 'माय हसबैंड्स वाईफ' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अभिनय क्षेत्रात सर्वाधिक उंचीवर पोहोचण्यात तिला अपयश मिळालं. पहिल्या सिनेमाच्या 7 वर्षानंतर तिला रवीना टंडनसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली. 'मात्र' या सिनेमात तिने काम केलं.
वादासोबत अलीशाचं नातं
वाद आणि अलीशा हे नातं खूप जुनं आहे. अभिनया व्यतिरिक्त अलीशा वादांमुळे चर्चेत राहिली. अलीशाने अभिनेता इमरान हाश्मीसोबत 'आईना' चित्रपटात काम केलं. हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. पण सहकलाकारासोबत तिच्या अफेअरच्या चर्चा खूप रंगल्या.
MMS व्हिडिओ लीक मागची कहाणी
या सर्व गोष्टीं व्यतिरिक्त, या अभिनेत्रीसोबत एक मोठी घटना घडली. ज्यामुळे अलीशाचं आयुष्यचं बदलून गेलं. ती गोष्ट म्हणजे अलीशाची MMS कॉन्ट्रोवर्सी.
अलीशाच्या बॉयफ्रेंडने एक खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पण यानंतरही तिने हार मानली नाही. तिने बॉयफ्रेंड विरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. बदनामीच्या भीतीने तिच्या घरच्यांनी तिला पोलिसात जाण्यासाठी विरोध केला. पण अलीसाने जेव्हा कोणाचं ऐकलं नाही आणि एफआयआर दाखल केली. त्यानंतर घरातील लोकांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला.
रस्त्यावर फिरताना दिसली अभिनेत्री
या घटनेनंतर अलीशाला स्वत:साठी घर देखील राहिलं नाही. ती रस्त्यावर फिरुन, आश्रमात जाऊन दिवस काढू लागली. या सगळ्या गोष्टींचा खुलासा खुद्द अलीशा खान हिने आपल्या मुलाखतीत केला.