प्रियांका-निकचा 'हा' निर्णय हैराण करणारा?

इतर कलाकारांनाही धक्का बसला असावा 

Updated: Nov 7, 2018, 02:32 PM IST
प्रियांका-निकचा 'हा' निर्णय हैराण करणारा?

मुंबई : रणवीर- दीपिकाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा होणारा पती, अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नालाही आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लग्नाआधीच्या या दिवसांचा प्रियांका आणि निक पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत. मग ते प्रियांकाचं ब्रायडल शॉवर असो किंवा मग बहुचर्चित बॅचलरेट असो. 

'देसी गर्ल'ने निकसोबत असलेलं नातं सर्वांसमोर उघड केल्यानंतर लगेलल, साखपुडा केल्याचं पाहायला मिळालं. तिच्या साखरपुड्याच्या वेळी कलाविश्वातून अगदी मोजकेच चेहरे पाहायला मिळाले. 

साखरपुड्याला बी- टाऊनमधील तिचा मित्रपरिवार आला नसला तरीही तिच्या लग्नाचा बऱ्याच सेलिब्रिटींची उपस्थिती अपेक्षित होती. पण, आता ते शक्य नाही. 

कारण लग्नसोहळा हा अत्यंत खासगी स्वरुपात करण्याचा निर्णय प्रियांकाने घेतला असून, त्यात फक्त कुटुंबीय आणि काही खास मित्रांचीच उपस्थिती असणार आहे. 

सूत्रांचा हवाला देत 'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाच्या लग्नसोहळ्यासाठी सेलिब्रिटी मंडळींना बोलावणं आलं नाही आहे. त्यामुळे आता इतरांप्रमाणेच त्यांनाही प्रियांकाचा विवाहसोहळा पाहण्याची संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

लग्नसोहळ्यासाठी फार पाहुण्यांना आमंत्रित न करणारी प्रियांका रिसेप्शनमध्ये मात्र तिच्या संपूर्ण मित्रपरिवाराला आमंत्रित करेल हे नक्की. 

तुर्तास तिच्या लग्नाची तयारी अगदी दणक्यात सुरु असून लेहंग्यापासून ते जोधपूरमध्ये ज्या ठिकाणी ही देसी गर्ल विवाहबंधनात अडकणार आहे तेथे प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात येत असून, सर्व व्यवस्थेची पाहणी सुरु असल्याचं कळत आहे.