'आम्ही प्रॅक्टीस करण्यात...', फॅमिली प्लानिंगबद्दल हे काय बोलून गेली प्रियांका ?

नात्यालाही पुरेसा वेळ देताना दिसत आहे.   

Updated: Jan 14, 2022, 12:45 PM IST
'आम्ही प्रॅक्टीस करण्यात...', फॅमिली प्लानिंगबद्दल हे काय बोलून गेली प्रियांका ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडची 'देसी गर्ल' अभिनेत्री(Priyanka Chopra) आणि पती, गायक निक जोनास (Nick Jonas) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कामात बरेच व्यग्र आहेत. असं असलं तरीही ही जोडी त्यांच्या नात्यालाही पुरेसा वेळ देताना दिसत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जोडी सातत्यानं त्यांचे काही खास फोटो चाहत्यांसाठी शेअर करताना दिसते.

फक्त इतकंच नव्हे, तर एकमेकांना कामाच्या बाबतीतही प्रियांका आणि निक मोठा आधार देताना दिसतात. 

आता मुद्दा असा, की जिथं काही सेलिब्रिटी लग्नानंतर त्यांच्या कुटुंबाचा विचार करताना दिसतात, अर्थात फॅमिली प्लानिंग करताना दिसतात तिथेच निक्यांका अशा कोणत्या विचारात आहेत का?

खुद्द प्रियांकानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत तिनं आई होण्याबाबत वक्तव्य केलं आहे. 

'मुलं भविष्यासाठी आमच्या इच्छांपैकी एक महत्त्वाचा भाग आहेत. देवाच्या कृपेनं जे जेव्हा होतं तेव्हाच होतं....' असं प्रियांका म्हणाली. 

जेव्हा निक आणि तू हल्ली जरा जास्तच व्यग्र असता, असं प्रियांकाला विचारलं, तेव्हा ती खोडकरपणे उत्तर देत म्हणाली 'नाही... आम्ही प्रॅक्टिस करण्यात जास्त बिझी नाही आहोत... '

गरोदरपणा, मातृत्त्वाविषयी बोलण्याची प्रियांकाची ही पहिलीच वेळ नाही. 

याआधीही एका मुलाखतीमध्ये घर घेणं आणि बाळाला जन्म देणं हे माझ्यासाठी 'To Do' लिस्टमध्ये असणाऱ्या गोष्टींपैकी एक आहेत, असं ती म्हणाली होती. 

'माझ्या मते घर तेच आहे जिथे तुम्ही आनंदात असता. जोपर्यंत माझ्या आजुबाजूला ती माणसं आहेत ज्यांच्यावर माझं प्रेम आहे' असा सुंदर विचार तिनं सर्वांसमोर ठेवला होता. 

निकनंही आपलंही बाळ असेल अशी आशा व्यक्त केली होती. आता या जोडीची ही वक्तव्य पाहता आता लवकरच या दोघांच्या कुटुंबात लहानग्याची एंट्री होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.