मुलीच्या जन्मानंतर व्हायरल होतोय प्रियांकाचा व्हिडीओ, पाहूनच म्हणाल किती गोड...

घर, संसार सारंकाही परदेशात थाटणाऱ्या या अभिनेत्रीनं नुकतंच एका चिमुकलीचं स्वागत केलं.   

Updated: Jan 27, 2022, 02:39 PM IST
मुलीच्या जन्मानंतर व्हायरल होतोय प्रियांकाचा व्हिडीओ, पाहूनच म्हणाल किती गोड...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं गायक निक जोनास याच्याशी लग्न केल्यानंतर ती परदेशातच अधिक काळ घालवू लागली. पती, घर, संसार सारंकाही परदेशात थाटणाऱ्या या अभिनेत्रीनं नुकतंच एका चिमुकलीचं स्वागत केलं. (Priyanka Chopra Daughter)

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियांकानं लेकिच्या जन्माची गोड बातमी सर्वांना सांगितली. 

अनेकांनीच यानंतर तिच्या मुलीचा चेहरा पाहण्याची उत्सुकताही व्यक्त केली. पण, सरोगसीच्या माध्यमातून जन्माला आलेली प्रियांका आणि निकची मुलगी प्रसूतपूर्व काळातच जन्मली. 

सध्या तिची काळजी घेतली जाण्याची आवश्यकता असल्यामुळं इतक्यात काही देसी गर्लच्या लेकीला पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार नाही. 

आता राहिला मुद्दा सोशल मीडियावर प्रियांकाच्या फोटोंचा जिथं ती लहान मुलांना घेऊन वावरताना दिसते, तर ते तिचे भाची, पुतण्यांसोबतचे फोटो. 

आता लेकिच्या जन्मानंतर तिचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. मुळात हा व्हिडीओ तिच्या लग्नापासूनच सर्वांना गुंतवून ठेवत आहे. 

प्रियांच्या लग्नातील ख्रिश्चन लग्नासाठीचा लूक या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. 

जागतिक स्तरावर लोकप्रिय असणाऱ्या राल्फ लॉरेन या डिझायनिंग ब्रँडकडून तिचा वेडिंग गाऊन डिझाईन करण्यात आला होता. 

याच गाऊनच्या स्टिचिंगपासून फिटिंगपर्यंतचे काही क्षण या व्हिडीओतून पाहता येत आहेत. अवघ्या 40 सेकंदांच्या या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. 

प्रियांकासाठी डिझायनरनं मोडली परंपरा 
प्रियांका चोप्राच्या लग्नात या डिझायनरनं एक मोठी परंपरा मोडली. आतापर्तच्या कारकिर्दीत या डिझायनरनं फक्त तीनदाच वेडिंग गाऊन डिझायनर केला होता. तोसुद्धा कुटुंबातील मंडळींसाठी. 

प्रियांका चोप्रा एक अशी महिला ठरली, जिच्या लग्नाचा गाऊन राल्फ लॉरेन यांनी डिझाईन केला. 

प्रियांका आणि निकच्या प्रेमकहाणीमध्ये आपली महत्त्वाची भूमिका असल्याचं समजत त्यानं गाऊन डिझाईन करण्याचा निर्णय स्वत:हून घेतला होता. आहे की नाही मजेशीर किस्सा? 

Priyanka Chopra's veil is bigger than 1RK flat in Mumbai: Netizens take a  dig at the actress' 75-feet veil