भयंकर आजारामुळं लोकप्रिय अभिनेत्रीनं स्वत:ला घरात डांबलं

प्रसिद्धीझोतात आलेल्या एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीलाही अशाच प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.   

Updated: Mar 11, 2022, 02:13 PM IST
भयंकर आजारामुळं लोकप्रिय अभिनेत्रीनं स्वत:ला घरात डांबलं  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कामाच्या व्यापात आपण अनेकदा प्रकृतीकडे, शरीरातील लहानमोठ्या बदलांकडे दुर्लक्ष करतो. पण, हीच सवय पुढे जाऊन इतकी महागात पडते की याची किंमत फेडताना आणखी नवी आव्हानं आपल्यापुढं उभी ठाकतात. 

मालिका जगतातून प्रसिद्धीझोतात आलेल्या एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीलाही अशाच प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. 

'उतरन' या मालिकेत तपस्या साकारणारी ही अभिनेत्री आहे, रश्मी देसाई. प्रकाशझोतात असतानाच एकाएकी ती नाहीशी झाली. कोणत्याही कार्यक्रमातही तिची हजेरी दिसेना. 

प्रदीर्घ कालावधीनंतर जेव्हा रश्मी माध्यमांसमोर आली, तेव्हा मात्र तिनं सांगितलेल्या प्रसंगांनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आपण, एका गंभीर आजाराशी झुंज दिल्याचं सांगत या आजारामुळं आपण स्वत:ला घरात डांबून घेतल्याचंही सांगितलं. 

तिनं केलेला हा उलगडा सर्वांना हादरा देऊन गेला. रश्मीला असा कोणता आजार जडला, ज्यामुळं तिला डांबलेलं रहावं लागलं हाच प्रश्न अनेकांनी विचारला. 

आपल्या आजारपणाविषयी सांगताना रश्मीनं आपल्याला सोरायसीस झाल्याचं सांगितलं. उन्हात फिरणं, अती तणाव या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला होता. 
 
असं न केल्यास आजारपण बळावतं हे वास्त तिला कळून चुकलेलं. पण, एक अभिनेत्री असल्यामुलं आपल्यासाठी चेहराच सर्वकाही आहे, अशातच त्वचेरा विकार होणं तिला नैराश्यात लोटण्यास कारणीभूत ठरलं. 

काय आहे सोरायसिस? 
सोरायसिस एक त्वचारोग आहे. ओव्हरअॅक्टिव इम्यून सिस्टिममुळे हा आजार जडतो. त्वचेतील पेशींच्या वाढीशी या आजाराचा संबंध आहे. औषधोपचार आणि जीवनशैलीमधील बदल या आजाराची तीव्रता कमी करण्यास मदत करतात. 

काय आहेत लक्षणं? 
- त्वचेवर लाल रंगाचे चट्टे दिसणं, ज्यावर एखादं पापुद्र तयार होत असेल. 
- शरीराच्या कोणत्याही भागावर पांढरं पापुद्र तयार होताना दिसणं. 
- रुक्ष किंवा फाटलेली त्वचा, खाज येणारी त्वचा 
- सांध्यांमध्ये सूज 
- डोक्याच्या त्वचेवर कोंड्यासारखा एक थर तयार होणं 

आजार कितीही मोठा किंवा लहान असता तकरीही न घाबरता त्यावर उपचार घेणं आणि सकारात्मकतेनं यातून बाहेर येणं कायम मदतीचं ठरतं. रश्मीलाही याच सकारात्मकतेची मोठी मदत झाली.