Samantha Ruth Prabhu: सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या पहिल्या वेब सीरिज 'सिटाडेल हनी बनी' मुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये ती पहिल्यांदाच बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता वरुण धवनसोबत दिसणार आहे. ही वेब सीरिज लवकरच ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याबद्दल वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू देखील खूप उत्सुक आहेत. ते देखील ही वेब सीरिज रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, समंथा रुथ प्रभूने तिच्या अभिनयाशी संबंधित आव्हानांबद्दल मनमोकळ्या बोलली आहे.
अभिनयाबद्दल काय म्हणाली समंथा रुथ प्रभू?
समंथा म्हणाली की, तिच्या करिअरमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ती स्वत: ला 'वाईट' अभिनेत्री म्हणून समजत होती. 2010 मध्ये 'ये माया चेसावे' या तेलगू चित्रपटातून तिने नागा चैतन्यसोबत पदार्पण केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला एस.एस. राजामौली यांच्या 'ईगा' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. चाहते समंथाच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक करत असतात. समंथा स्वत: म्हणाली होती की, काही चित्रपटांमध्ये तिचा अभिनय हवा तसा चांगला नव्हता.
'मी खूप वाईट..' समंथा स्वत: ला अशी का म्हणाली?
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना समांथा गमतीने म्हणाली होती की, मी माझे अर्धे आयुष्य खूप वाईट वागले आहे. कधी कधी आजही मी वाईट कामगिरी करू शकते. संघ कसा आहे यावर सर्व अवलंबून आहे. मी स्वत: ला पूर्ण श्रेय देईन असे वाटत नाही. जेव्हा योग्य लोक एकत्र असतात तेव्हा काम चांगले होते. म्हणूनच कधी कधी आजही मी हनीसारखे वाईट वागू शकते. समंथा रुथ प्रभूने सध्या तिच्या आगामी वेब सीरिज 'सिटाडेल हनी बनी'मुळे चर्चेत आहे.