मुंबई : २०११ मध्ये झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या पिंजरा या मराठी टीव्ही मालिकेत संस्कृती बालगुडेने ‘आनंदी’ या मालिकेतल्या भूमिकेने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.संस्कृती बालगुडे एक अभिनेत्री आणि डान्सर आहे, तिचा जन्म १९ डिसेंबर १९९२ या दिवशी पुण्यात झाला.संस्कृती बालगुडेने माकडाचं लगीन या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अनेक दिवसांपासून संस्कृती बालगुडे बॉलिवूडमध्ये काम करणार असल्याचा चर्चा होत असताना नुकतीच तिने सोशल मीडियावर तिच्या बॉलिवूड प्रोजेक्टबद्दल मोठी अपडेट दिली आहे. " करेज ( Courage ) अस या बॉलिवूड प्रोजेक्टच नाव असून याची Wrap Up पार्टी नुकतीच पार पडली.
संस्कृती कायम तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते आणि आता तिचा हा बॉलिवूड प्रोजेक्ट काय असणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. करेज मध्ये संस्कृती शारीब हाश्मी सोबत दिसणार आहे. शारीब हाश्मीने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख संपादन केली असून कायम ती तिचा भूमिकांसाठी चर्चेत असते आता संस्कृती आणि शारीब हाश्मी ही जोडी नक्की काय घेऊन येणार आहे अजून गुलदस्त्यात आहे.
संस्कृती फॅशन आणि तिच्या लाईफस्टाईल आणि अनेक गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चेत तर असते पण तिने मागच्या काही दिवसात सोशल मीडियावरून ब्रेक घेऊन ती लेह लडाख मध्ये जाऊन विस्पशना देखील करून आली आहे. अभिनय, कला, फॅशन अश्या संस्कृतीच्या अनेक बाजू सगळ्यांनी आजवर अनुभवल्या आहेत आता संस्कृतीच बॉलिवूड पदार्पण बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.येणाऱ्या काळात संस्कृती प्रेक्षकांना अजून वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे यात शंका नाही.
संस्कृती इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय असते. काळे धंदे या वेबसीरिजमध्येही संस्कृती बालगुडेने काम केलं आहे. ज्या सीरिजची चांगलीच चर्चा झाली.सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती कायमच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.संस्कृती बालगुडेला तिच्या बोल्डनेससाठीही ओळखलं जातं.