Satish Wagh Murder Case: भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याची घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर चालत्या गाडीतच त्यांचा तीक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण करून व गळा सतीश वाघ यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे.
सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या खुनाची सुपारी दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करुन खून करण्यात आला होता. त्यानंतर यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह सापडला होता. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नीच या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याचा समोर आलं आहे.
पुण्यात सतीश वाघ यांची हत्या झाली होती. सतीश पहाटे घराजवळ मॉर्निंग वॉक करत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांतच चारचाकी कारमध्ये त्यांचा खून करण्यात आला होता. नंतर शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. पोलिसांनी जलद गतीने तपास करुन मारेकऱ्यांना अटक केली होती. त्याचबरोबर या खुन्याचे सुत्रधार यांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
खून प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली होती. सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी 5 लाखांची सुपारी देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सतीश वाघ यांच्या पत्नीचेही नाव समोर आले होते. त्यामुळं पोलिसांनी त्यांचीही कसून चौकशी केली होती. त्यानंतर या कटात त्यादेखील सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांनादेखील अटक केली आहे. सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा होते.