20 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत 39 वर्षीय रणवीर सिंग करणार रोमान्स, वयातील अंतर पाहून निर्मात्यावर भडकले लोक

अभिनेता रणवीर सिंग आदित्य धरच्या बिग बजेट चित्रपटाचा एक भाग असणार आहे. लवकरच तो या चित्रपटात 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 5, 2024, 01:42 PM IST
20 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत 39 वर्षीय रणवीर सिंग करणार रोमान्स, वयातील अंतर पाहून निर्मात्यावर भडकले लोक title=

Sara Arjun : अभिनेता रणवीर सिंग आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' मध्ये दिसणार आहे. त्याबरोबरच रणवीर सिंग आदित्य धरच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. आदित्य धरचा हा चित्रपट बिग बजेट असणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अभिनेता संजय दत्त, आर माधवन आणि अर्जुन रामपाल देखील दिसणार आहेत. चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र, चित्रपटाबाबतच्या अपडेटनंतर चाहते निर्मात्यांवर नाराज झाले आहेत. 

कारण, या चित्रपटात रणवीर सिंगसोबत 19 वर्षांची अभिनेत्री सारा अर्जुन दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग या 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. 

कोण आहे सारा अर्जुन? 

आदित्य धरच्या आगामी चित्रपटातील महिला कलाकारांबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.  रिपोर्टनुसार, एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, 19 वर्षीय सारा अर्जुनला रणवीर सिंगच्या प्रेमाच्या भूमिकेत कास्ट केले जाईल. अभिनेत्री सारा अर्जुनने साउथ चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून देखील काम केलं आहे. साराने 'पोनियिन सेलवन'मध्ये ऐश्वर्या रायच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 

रणवीर आणि साराच्या वयातील अंतर पाहून चाहते संतापले

39 वर्षीय रणवीर सिंग 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार असल्याची बातमी समोर आल्या आहेत. ही बातमी वाचल्यानंतर सोशल मीडियावरील लोक निर्मात्यावर संतापले आहेत. अभिनेत्री 19 वर्षांची असून रणवीर सिंग 39 असल्यामुळे लोक सध्या निर्मात्यावर संतापले आहेत. अशा परिस्थितीत दोघांमधील प्रेमसंबंध योग्य नाही असं चाहत्यांनी म्हटलं आहे. ही माहिती Reddit च्या Bolly Blinds आणि Gossip ग्रुपवर शेअर करण्यात आली आहे. यानंतर चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून निर्मात्यांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रणवीर सिंगचा काही दोष नाही

एका Reddit वापरकर्त्याने म्हटले की, रणवीर सिंगचा पहिला चित्रपट 'बँड बाजा बारात' प्रदर्शित झाला होता तेव्हा ती 5 वर्षांची होती. त्यावर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, एक 39 वर्षांचा माणूस लहान मुलीसोबत रोमान्स करेल. हे योग्य आहे असे त्यांना कसे वाटले? त्याचवेळी काही लोक म्हणाले की, यामध्ये रणवीर सिंगचा काही दोष नाही. त्यामुळे त्याला ट्रोल करू नका. याआधी देखील असे अनेक वेळा घडलं आहे.