प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते, 'माझा गळा दाबून मला मारून टाका'

'माझा गळा दाबून मला मारून टाका' असं म्हणायची वेळ या प्रसिद्ध अभिनेत्रीवर का आली? कोण आहे ही अभिनेत्री?

Updated: Jul 15, 2021, 08:12 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते, 'माझा गळा दाबून मला मारून टाका' title=

मुंबई: कोरोनाचा फटका जसा सर्वसामन्य नागरिकांना बसला तेवढाच तो बॉलिवूड आणि सिनेसृष्टीलाही बसला आहे. हिंदी सिनेमाचं विश्व जेवढं झगमगीत आहे तेवढंच त्यातील सत्य परिस्थिती समोर आल्यानंतरच चित्र भयंकर आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्रीनं कंटाळून माझा गळा दाबून मला मारून टाका असं विधान केलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर मनोरंजनच नाही तर सोशल मीडियावरही खऴबळ उडाली आहे. 

नुकतीच अभिनेत्री शागुफ्ता अली, अनाया सोनी या कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना मदतीसाठी विनंती केली होती. त्यानंतर त्याच काळातील सुपरहिट भोजपुरी फिल्म 'नादिया के पार' या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री सविता बजाज यांनीही आर्थिक मदतीची मागणी केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या जीवनातील अडचणींचा उल्लेख केला.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सविता बजाज यांनी त्यांच्या आर्थिक अडचणी मांडल्या. आर्थिक चणचण भासत असल्याचं दु:ख व्यक्त केलं. 'कोरोना आणि त्यानंतर श्वसनाच्या आजारामुळे असलेले सगळे पैसे संपले. हातातील सगळे पैसे संपल्यानं आता जगायचं कसं हा प्रश्न पडला आहे.'

'एकेकाळी एवढी प्रसिद्धी मिळाली असताना म्हतारपणात असे दिवस पाहावे लागतील याचा विचार सुद्धा केला नव्हता, असं सविता म्हणाल्या.  जेव्हा कोरोनावर यशस्वीपणे मात करून घरी परतले तेव्हा वाटलं आता सगळं ठिक होईल. मात्र श्वसनाचा त्रास जाणवू लागला.' 

'दोन संस्थांकडून थोडी मदत मिळाली. त्यामुळे किमान मला उपचार आणि दिवस ढकलणं सोयीचं झालं. माझी काळजी घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी कोणी नाही असंही त्यांनी आपलं दु:ख मांडलं.' 25 वर्षांपूर्वी मी ठरवलं होतं की मी दिल्लीत घरी जाईन. मात्र त्यांनी मला स्वीकारलंच नाही.' 

सविता बजाजने 'निशांत', 'नजराना', 'बीटा हो तो ऐसा', पिंजर, भोजपुरी चित्रपट 'नादिया के पार' यासारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे ज्यात अभिनेता सचिन तिच्यासोबत दिसला होता. नुक्कड, मैका आणि कवच अशा लोकप्रिय मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे.