Horse Big Jasper: जगप्रसिद्ध असलेल्या सारंखेडाच्या अश्वमेळ्यामध्ये चर्चा आहे ती बिग जास्पर घोड्याची. बिग जास्पर सर्वांचे लक्ष वेधून घेतोय, कारण त्याची किमत तब्बल 19 कोटी सांगितली जातेय. नेमका बिग जास्पर का भाव खातोय? सविस्तर जाणून घेऊया.
सारंगखेड्याच्या यात्रेतला हा बिग जास्पर घोडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. कारण आहे य़ा घोड्याची किंमत.या घोड्याची किंमत लाखांत नसून कोटींमध्ये आहे. कोटी आणि तेही तब्बल 19 कोटी. आपण आजवर कोटीमध्ये वाहनांची किंवा बंगल्यांची किंमत ऐकलेली असेल मात्र प्राण्यांची किंमत आणि तीही कोटीमध्ये कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही. मात्र हे सत्य आहे. घोडे बाजारात 19 कोटींचा हा रुबाबदार घोडा सध्या चांगलाच भाव खातोय.
सारंगखेडा घोडे बाजारात दरवर्षी दाखल होणारे विविध जातीचे घोडे हे नेहमीच चर्चेचा विषयही ठरतात.त्यातच या वर्षी बाजारात आलाय.'बिग जास्पर' , सारंखेडातल्या या अश्व बाजारामध्ये त्याला पाहण्यासाठी बघ्याची गर्दी होतेय.त्याच्यात असलेल्या ब्लड लाईनमुळेच त्याची एवढी किंमत निश्चित करण्यात आलेली आहे.
उच्च ब्लड लाईनच्या या घोड्याचा चेहरा, कान, मान , पुठ्ठा, सर्वच आकर्षक आहे.नऊ वर्षाच्या बिग जास्परच्या आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी 5 जणांचं पथक आहे. त्याला दररोज लागणारा आहार आणि व्यायामाची विशेष काळजी घेतली जाते. त्याला जेवणामध्ये दररोज करड्याची कुट्टी, चण्याचा खुराक आणि सात लिटर दूध दिले जातं.कूणच घोड्याची जात आणि वय ओळखण्याच्या पद्धती अश्व जानकार लोकांना माहीत असतात त्यामुळे घोडे खरेदी करताना त्यांचे कान आणि त्यांचे दात पाहूनच खरेदी केले जात असतात. याच वैशिष्ट्यांवरती घोड्याची किंमत ठरते आणि तो लाखमोलाचा बनतो.
सारंखेडा च्या घोड्यांच्या धावपट्टीवर जेव्हा जास्पर उतरतो तेव्हा त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेय.अश्व बाजारामध्ये बिग जास्पर या वर्षाचं आकर्षण आहे.