'भूक न लागण्याची औषध घ्यायची श्रीदेवी'

 श्रीदेवीच्या मृत्यूचा आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलायं. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 27, 2018, 07:13 PM IST
'भूक न लागण्याची औषध घ्यायची श्रीदेवी' title=

नवी दिल्ली : बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीचं पार्थिव आज संध्याकाळी पर्यंत भारतात आणलं जाणार आहे.

कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर आता कपूर कुटुंबियांना पार्थिव सोपवणार आहे. त्यानंतर पार्थिवावर रासायिनक लेप लावला जाईल. यासाठी जवळपास 1.30 तास लागतो.

त्यामुळे पार्थिवाला मुंबईला येण्यासाठी संध्याकाळ होऊ शकते. दरम्यान श्रीदेवीच्या मृत्यूचा आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलायं.

२९ सर्जरी 

२०१२ मध्ये 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमातून कमबॅक केल्यानंतर श्रीदेवीने खूप कॉस्मेटिक सर्जरी केल्या. अधिक सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवीने २९ सर्जरी केल्या. चेहरा, नाक, ओठ अशा अवयवांच्या या सर्जरी होत्या. 

श्रीदेवी कॅलिफॉर्नियामध्ये प्लास्टिक सर्जनकडून इलाज करुन घेत होती. तसेच भूक न लागणे आणि मेटाबॉलिज्म वाढण्याची औषधे खात होती. गल्फ न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिलेयं.

शरीरासाठी घातक 

ही औषधं सुरू असताना जर अल्कोहोल घेतले तर शरीरासाठी घातक ठरते. यामुळे ह्दयाचे ठोके अनियमित होतात. हार्ट बीट्स खूप वाढून किंवा खूप कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे श्रीदेवीसोबत झाल्याचा अंदाज वर्तविला जातोय, असेही गल्फ न्यूजने म्हटलेय.

बाथटबमध्ये बेशुद्ध 

डिनरला जाण्यापूर्वी ती बाथरुममध्ये गेली तेव्हाच फेंटिंग स्पेल येऊन ती बेशुद्ध होऊन बाथटबमध्ये पडली. पाणी भरलं असल्याने त्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जातेय.

भारतात आणण्याचा मार्ग मोकळा 

भारतीय दुतावास आणि कपूर कुटुंबियांना पत्र सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे पार्थिव भारतात आणण्यासाठीचे सर्व मार्ग आता मोकळे झाले आहेत.

दुबई फॉरेंसिक टीम आणि पोलिसांनी सगळे रिपोर्ट्स सरकारी वकिलांना सोपवले आहेत. ऑटोप्सी रिपोर्ट आल्यानंतर श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. श्रीदेवी यांचं पार्थिव दुपारी 3.30 पर्यंत मुंबईकडे रवाना होऊ शकतं.