श्रीदेवींचा अनिल कपूर सोबतचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल

श्रीदेवींच्या निधनाला 3 दिवस झाले. त्यानंतर आता पार्थिव भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 27, 2018, 03:32 PM IST
श्रीदेवींचा अनिल कपूर सोबतचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : श्रीदेवींच्या निधनाला 3 दिवस झाले. त्यानंतर आता पार्थिव भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच वेळ गेला. आज संध्याकाळी पार्थिव भारतात येण्याची शक्यता आहे.

श्रीदेवी यांचा अनिक कपूर यांच्यासोबतचा आणखी एक शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्रीदेवी आणि अनिल कपूर यांनी 12 सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. श्रीदेवींना असं वाटलं ही नसेल की अनिल कपूर यांच्यासोबतचा तो शेवटचा डान्स असेल. 

एका विवाह सोहळ्यात 'चिटियां कलाईयां' या गाण्यावर डान्स करतांना ते दिसत आहे. अनिल कपूरसोबतच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये श्रीदेवी खूप खूश दिसत होत्या.

पाहा व्हिडिओ

श्रीदेवी यांचा हा शेवटचा व्हिड़िओ ठरला आहे.