मुंबई : अभिनेता प्रतिक बब्बर सध्या भरपूर चर्चेत आहे. मात्र, तो त्याच्या कोणत्याही चित्रपट किंवा प्रोजेक्टमुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रतीकच्या आयुष्यात एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. सान्या सागरपासून वेगळं झाल्यानंतर प्रतीक बब्बरने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आजकाल तो एका अभिनेत्रीला डेट करत आहे. ती कोण आहे? जाणून घेऊया...
प्रतीक बब्बरने 2019 मध्ये सान्या सागरशी लग्न केलं होतं. मात्र, वर्षभरानंतर त्यांच्यातील अंतर वाढलं आणि दोघंही वेगळे झाले. कुटुंब आणि मित्रांसह एका खाजगी समारंभात लग्न करण्यापूर्वी दोघंही काही काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, लग्नानंतर त्यांच्यातील अंतर पाहून चाहत्यांना धक्काच बसला. पण, आता असं दिसतंय की, दोन्ही सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती केली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, प्रतीक बब्बर पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. यावेळी तो 'बार बार देखो' चित्रपटातील अभिनेत्रीला डेट करत आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रतिक बब्बर अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत आहे. एका रिपोर्टनुसार, दोघं केवळ एकमेकांना डेट करत नाहीत तर पूर्वी एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघंही जवळपास एक वर्षापासून सतत एकमेकांसोबत आहेत. चित्रपटसृष्टीतील एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली.
रिपोर्ट्सनुसार, प्रतीकने आपल्या कुटुंबात प्रियाबद्दल आधीच सांगितलं आहे. दोघं एकत्र जिममध्ये जातात. आता अशीही बातमी आहे. की, दोघांनाही त्यांचं नातं सध्या लो प्रोफाइल ठेवायचं आहे. याला कारण आहे सान्या. वास्तविक, सान्यासोबत प्रतीकचा घटस्फोट अद्याप झालेला नाही, परंतु त्याची प्रक्रिया सुरू आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर प्रतीक शेवटचे 'बच्चन पांडे' चित्रपटात काम करताना दिसला होता. प्रतिक बब्बर हा स्मिता पाटील आणि अभिनेता राज बब्बर यांचा मुलगा आहे.