'या' अभिनेत्रीचं लहानपणी झालं लैंगिक शोषण; सलमान खानवर गंभीर आरोप, आता जगतेय असं आयुष्य

 या अभिनेत्री पुन्हा तिच्या बालपणाशी संबंधित एक खळबळजनक खुलासा केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्यावर झालेल्या शारीरिक अत्याचाराचाही उल्लेख केला आहे.

Updated: Mar 17, 2024, 07:02 PM IST
'या' अभिनेत्रीचं लहानपणी झालं लैंगिक शोषण; सलमान खानवर गंभीर आरोप, आता जगतेय असं आयुष्य  title=

मुंबई : अनेकजण या मुंबई नगरीत आपली स्वप्न पुर्ण करायला येत असतात. त्यातले काही त्यात यशस्वी होतात तर काही मात्र होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिच्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. आज आम्ही जिच्या बद्दल बोलत आहोत त्या अभिनेत्रीनी ९० च्या दशकात एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. या अभिनेत्रीचं नाव सलमान खानसोबतही जोडले गेलं आहे. अनेकदा तिने तिच्या आणि सलमान खानच्या अफेअर्सच्या  आठवणींना उजाळा दिला आहे. अनेकदा ती तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच या अभिनेत्री पुन्हा तिच्या बालपणाशी संबंधित एक खळबळजनक खुलासा केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्यावर झालेल्या शारीरिक अत्याचाराचाही उल्लेख केला आहे.

ज्या अभिनेत्रीबद्दल आज आम्ही बोलत आहोत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री  सोमी अली आहे. नुकतीच सोमीने तिच्या बालपणाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तिने लहानपणी तिचं लैंगिक शोषण झाल्याचं सांगितलं आहे. यावेळी सोमीने सांगितलं की, तिचे वडील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते, त्यामुळे त्यांचे अभिनेत्रींशी संबंध होते. सोमी अलीच्या म्हणण्यानुसार, तिचे आई-वडील सतत एकमेकांशी भांडायचे.

अभिनेत्रीने मुलाखतीत खुलासा केला की, 'मी पाच वर्षांची होते तेव्हा, माझ्या आईला कीहीही बोलल्याबद्दल तिचा छळ केला जात होता. त्यावेळी माझ्या घरातील शेफकडून माझं लैंगिक शोषण झालं आणि नंतर वयाच्या नऊव्या वर्षी गेटकीपरने माझं लैंगिक शोषण केलं. मी शाळेत लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. कायम खिडकीच्या बाहेर एकटक बघत बसायचे. मला हे देखील माहित नव्हतं की मी त्यावेळी एका गंभीर पीटीएसडी आणि ट्रॉमा आजाराने ग्रस्त आहे.' 

बालपणीच्या कोणत्याच आठवणी आपल्या चांगल्या नसल्याचं सोमीने दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. सोमी पुढे म्हणाली,   'भारतात असताना मी अनेक शेड्स पाहिल्या आहेत. मग ते इंटिमेट संबंधात असो की, प्रोफेशनल आसोत किंवा माझ्या मैत्रीबद्दल. मात्र माझं सगळ्यात वाईट स्वप्न माझं नातं होतं. ज्याला मी आजही फाईट करत आहे. कारण 22 वर्षांपूर्वी संबंध तोडूनही मला अजूनही त्रास दिला जात आहे. सोमीला अनेकदा सलमानचा राग येतो आणि अलीकडेच तिने अभिनेत्याला वुमन बीटरही म्हटलं होतं.  इतकेच नाही तर सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याच्या आठवणी आजही तिला सतावत असल्याचं सोमीने म्हटलं आहे.

 1992 साली आलेल्या  'बुलंद' सिनेमात सोमी आणि सलमानने एकत्र काम केलं होतं. मात्र हा सिनेमात चित्रपटगृहात प्रदर्शित होवू शकला नाही.   1997 साली आलेल्या  'चूप' या सिनेमातील तिची भूमिका खूप गाजली. सध्या अभिनेत्री  सामाजिक कार्य करण्यामध्ये व्यस्त आहे. ती तिच्या एनजीओद्वारे दक्षिण आशियातील महिलांच्या हक्कांसाठी वकिली करते.