सरोगसीच्या वेदना नाही विसरलीये सनी; 4 मुली गमावल्यानंतर...

जाणून धक्काच बसेल 

Updated: Jan 4, 2022, 04:11 PM IST
सरोगसीच्या वेदना नाही विसरलीये सनी; 4 मुली गमावल्यानंतर...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) हिनं तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यातही काही महत्त्वाचे आणि तितकेच मोठे निर्णय घेतले आहेत. सनीला आजही तो दिवस आठवतो, जेव्हा तिनं पती डेनिअल वेबर याच्यासोबत मिळून 3 मुलांच्या पालकत्त्वाचा निर्णय घेतला होता. 

सनीनं सरोगसीच्या माध्यमातून नोआ आणि अशर या दोन मुलांना जन्म दिला होता. तर, निशा नावाची एक मुलगी तिनं दत्तक घेतली होती. 

सनीच्या मातृत्त्वाची बऱ्याचदा चर्चा झाली. हल्लीच तिनं सरोगसी मातृत्त्वाबाबतही बरीच चर्चा केली. एका मुलाखतीत तिनं आपल्या वेदनांना वाट मोकळी करुन दिली. 

दीड वर्षांपर्यंत सरोगसीची प्रक्रिया चालली. ज्यानंतर तिनं अखेर एका वळणावर हताश होत मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. 

काहीच ठरवल्याप्रमाणे होत नव्हतं... 
'आम्ही सरोगसीच्या प्रक्रियेतून जात होतो. यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत या प्रक्रियेनं दीड वर्ष घेतलं. 

सरोगसी ठरल्याप्रमाणे होत नाही हे लक्षात येताच आम्ही मुल दत्त घेण्याचाच विचार केला. आमच्याकडे सरोगसीसाठी सहा Eggs होते. ज्यामध्ये 4 मुली आणि 2 मुलं होती. 

मुली जन्मालाच येऊ शकल्या नाहीत आणि... 
सनीनं मुलींच्या जन्माबाबत मोठा खुलासा झाल्याचं सांगत म्हटलं, 'अमेरिकेत बाळाचं लिंग सांगितलं जातं. जिथं तुम्ही जेनेटिक टेस्टिंगही करु शकता. 

हे सर्व अमेरिकेत होतं. इथे नाही. म्हणूनच आम्ही आईवीएफ (इन विट्रो फर्टिलाइजेशन) केलं. 

मुलींसाठीचे Eggs मात्र फार तग धरु शकले नाहीत. त्यांतून बाळाचा जन्म झाला नाही. 

ही बाब प्रत्यक्षात मन तोडणारी होती. अशा वेळी तुम्हाला अपयशाची जाणीव होते. तुम्ही अपयशी आहात असंच तुम्हाला वाटतं. तुम्ही फारच हताश आणि विचित्र भावनेनं ग्रासलेले असता.'

पुढे सनी आणि डेनिअलनं मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. यासाठीही बराच काळ गेला. कागदपत्रांचा व्यवहारही झाला. तेव्हाच कळलं की सरोगसीतून उरलेल्या दोन Eggs मुळे दोन मुलं जन्माला आली आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

त्याच आठवड्यात तिनं एक मुलगीही दत्तक घेतली होती. अतिशय कमी वेळातच सनीनं 3 मुलांचं पालकत्वं स्वीकारलं होतं. 

आपल्या जीवनात घडलेल्या या सर्व घडामोडी म्हणजे देवानं आखलेली एक योजनाच होती, असं सनी मानते.