बॉलिवूड अभिनेत्रीकडून अडीच वर्षानंतर जुन्या घराचा कायापालट

घरात तिने तयार केलेली लायब्ररी सुद्धा सगळ्यांचच लक्षवेधून घेणारी आहे.

Updated: Jul 31, 2021, 04:03 PM IST
बॉलिवूड अभिनेत्रीकडून अडीच वर्षानंतर जुन्या घराचा कायापालट

मुंबई: स्वरा भास्करने तिच्या घराचा मेकओव्हर केला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ती या घरात राहत आहे. स्वराने जुन्या घरात  पहिली रात्र घालवल्याच्या अनुभव एका पोस्टच्या माध्यमातून  शेअर केला आहे. स्वराने घराचे काही फोटो शेअर केले, ज्यात तिचा भाऊ ईशान आणि आई इरा भास्कर दिसत आहेत.

घराच्या मेकओव्हरचे फोटो शेअर करताना स्वराने लिहिलं आहे, "मी अडीच वर्षांनंतर माझ्या नवीन 'जुन्या ' घरात परतले. 2019 नंतर आमच्या या नव्या घरात पहिली रात्र घालवण्याचा खूप आनंद झाला आहे. कोरोना सारख्या महामारीने लोक गमावल्यानंतर, जग, माझे सर्व आयुष्य, माझे जीवन बदलले होते. तरीही बरेच काही आहे ज्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत..'

यानंतर, आणखी एका ट्विटमध्ये स्वराने आईबद्दल लिहिले आहे. 'माझी बॉस आई मी घरी परत आली आहे याची खात्री करत आहे.' परिवारासह स्वराने हे घर मोठ्या प्रेमाने सजवले आहे. घरात उत्तम फर्निचर आणि पेटींग दिसून येत आहेत.

घरात तिने तयार केलेली लायब्ररी सुद्धा सगळ्यांचच लक्षवेधून घेणारी आहे.  सर्वांत आधी तिने आपल्या पुस्तकांना सजवून ठेवलं आहे.