शिल्पाची जोरदार बदनामी, दिग्दर्शकांने उठवला आवाज

हंसल मेहता यांनी ट्वीट करत लिहिलंय की, चांगल्या काळात सगळे पार्टी करण्यासाठी येतात. 

Updated: Jul 31, 2021, 03:25 PM IST
शिल्पाची जोरदार बदनामी, दिग्दर्शकांने उठवला आवाज  title=

मुंबई: पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला ही चर्चेत आहे. पतीवर केल्या जाणाऱ्या आरोपानंतर शिल्पाला ही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो आहे. दरम्यान, दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आता शिल्पा शेट्टीची समर्थनार्थ वक्तव्य केलं आहे.  हंसल मेहता यांनी पुढे येत बॉलिवूड स्टार्सनं धरलेलं मौन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 

हंसल मेहता यांनी ट्वीट करत लिहिलंय की, चांगल्या काळात सगळे पार्टी करण्यासाठी येतात. 

हंसल मेहता यांचे एकापाठोपाठ तीन ट्विट

हंसल मेहतांनी एकापाठोपाठ एक तीन ट्वीट शेअर केले आहेत. ते म्हणाले की जर तुम्ही शिल्पा शेट्टीसोबत उभे राहू शकत नसाल तर किमान तिला एकटे सोडा आणि कायद्याला काय ते ठरवू द्या? त्यांना सन्मानाने आणि गोपनीयतेने जगू द्या. हे दुर्दैवी आहे की जी व्यक्तिमत्व लोकांमध्ये प्रसिद्ध असतात, त्यांची बदनामी होत असताना  त्यांना स्वतःचा बचावासाठी असंच सोडून दिल जातं आणि न्याय मिळण्यापूर्वीच त्यांना दोषी घोषित केलं जातं.

आधीच मोठं नुकसान 

हंसल मेहता पुढे लिहितात की 'हे मौन हा एक प्रकारचा नमुना आहे. चांगल्या काळात प्रत्येकजण पार्टी करायला असतात. पण जेव्हा वाईट  वेळ सुरु असते तेव्हा सगळे शांत असतात. त्यांना बाजूला केलं जातं. सत्य काय आहे याचा काही फरक पडत नाही, त्यांचे आधीच नुकसान केले गेले आहे.