#MeToo विकास बहलला क्लीन चिट, तापसीने दिली अशी प्रतिक्रिया

अभिनेत्री तापसी पन्नूने लैगिंक अत्याचाराच्या विरोधात प्रतिक्रिया दिली.

Updated: Jun 5, 2019, 09:41 PM IST
#MeToo विकास बहलला क्लीन चिट, तापसीने दिली अशी प्रतिक्रिया title=

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू लैगिंक अत्याचाराच्या विरोधात तिने प्रतिक्रिया दिली आहे. हॅशटॅग मीटू मोहीम पुढे सुरु राहिली पाहिजे, असे तापसी पन्नू म्हणते. विकास बहलला क्लिन चिट दिल्यानंतर दोन दिवसांने तापसी पन्नूने आपली प्रतिक्रीया दिली आहे. ‘फॅंटम फिल्म्स’च्या एका माजी कर्मचारीने विकासवर लैंगिक अत्याचारचा  आरोप केला होता. मात्र या प्रकरणात विकास बहलला क्लीन चिट मिळाली आहे. दरम्यान, तापसीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अत्याचाराबाबत आवाज उठवला गेला पाहिजे. जर आरोप होत असेल आणि त्या व्यक्तीला शिक्षा होत नसेल तर काय उपयोग, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. 

विकास बहला मीटू आरोपातून क्लिन चिट मिळाल्याने त्याचा आगामी चित्रपट ‘सुप्पर 30’ हा अडचणीत येणार नाही. दरम्यान, त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आरोप झाला त्यावेळी त्याचे सिनेमाच्या ट्रेलरवर नावही टाकण्यात आले नव्हते. दरम्यान, क्लिन चिट मिळाल्यानंतर ‘सुप्पर 30’ या चित्रपटाच निर्दशन केले आहे, असे विकास बहलचे नाव दिले गेले आहे. याआधी अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. 

 

अभिनेता अलोक नाथवरही लैंगिक अत्याचाराचा आरोप एका लेखिकेने केला होता. ती निर्देशिका होती. अलोक नाथ ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटमध्ये झळकले होते. अलोक नाथ यांच्याबद्दल तापसीला प्रश्न करण्यात आला.  त्यावर तापसीने सांगितले, जर कोण्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार आरोप होत असेल आणि व्यक्ती करत  असेल तर त्यानंतर त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. जर शिक्षा झाली नाही तर त्या मोहिमेचा काय उपयोग. महिलेला न्याय मिळाला नाही तर महिला आतून खचून जाते. महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे. अशा अनेक घटना होतात.  मात्र महिला गप्प राहतात. आताचा काळ बदलत आहे. महिलांनी त्यांच्यावर होण्याऱ्या अत्याचारवर प्ररखडपणे बोलले पाहिजे.