Actress Who Married 18 Year Older Muslim Guy : अभिनेत्री या कधीही त्यांच्या करिअरकडे पूर्ण लक्ष देतात आणि एकदा काय त्या यशाच्या शिखरावर पोहचल्या की त्यानंतर त्या लग्न बंधनात अडकतात. पण एक अभिनेत्री आहे जिनं 20 वर्षांची असताना पहिलं लग्न केलं. त्यातही तिचा जो नवरा होता तो तिच्याहून वयानं 18 वर्ष मोठा होता. लग्नाच्या बरोबर एकावर्षानंतर आई झाली आणि त्यानंतर 8 वर्षात ते विभक्त झाले. आता पुन्हा एकदा त्या अभिनेत्रीला प्रेम झालं आणि मग स्वत: पेक्षा 8 वर्ष छोट्या अभिनेत्याशी लग्न केलं. आता ही अभिनेत्री कोण याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल...
तर ही अभिनेत्री दुसरी कोणी नाही तर तनाज ईरानी आहे. तनाज ईरानीनं पहिलं लग्न हे 20 वर्षांची असताना फरीद कुरीम यांच्याशी केलं होतं. लग्नानंतर तिला एक मुलगी देखील झाली मात्र, त्यांचं लग्न हे जास्त काळ टिकलं नाही. फरीद कुरीम हे स्टेद आणि ड्रामा आर्टिस्ट होते. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत फरीदशी लग्न करण्याची इच्छा व्यक्ती केली. ते थिएटरमध्ये काम करतात. ज्या प्रकारे काम करतात. काम करतात, गायचे, मला ते आवडले होते आणि मग आम्ही लग्न केलं. फरीद आणि तनाज यांच्यात 18 वर्षांचं अंतर होतं.
त्याचं लग्न मोडण्याचं कारण सांगत तनाज म्हणाली की त्या दोघांच्या वयात असलेला फरक हा त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील अडथळा ठरत होता. ती पारसी कुटुंबातून आहे आणि जसं मी फरदीनशी लग्न केलं. त्यानंतर मला समजातून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी मला जास्त काही कळत नव्हतं. लग्नानंतरही मला काम करायचं होतं. आयुष्याचा आनंद घ्यायचा होता, पार्टी करायची होती. पण तो खूप मोठा होता. तो खूप चांगली व्यक्ती आहे पण फक्त वेळ चुकीची होती आणि त्यामुळे आमचं नातं मोडलं. लग्नानंतर तिनं इस्लाम धर्म स्वीकारला होता.
हेही वाचा : बादशाहनं पहिल्यांदाच दाखवला लेकीचा VIDEO; 7 वर्षांच्या जेसीमीचा रॅप पाहून सगळेच आश्चर्यचकित
घटस्फोटानंतर तनाजनं टिव्ही आणि चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 2006 मध्ये तनाजच्या आयुष्यात बख्तियार ईरानीची एण्ट्री झाली. ते दोघं गुरुकुलची शूट करत होते, तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर 2007 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. जियस आणि जारा अशी त्यांची नावं आहेत. तर तनाजची पहिल्या लग्नातून झालेली मुलगी जॅनी ही तिच्या वडिलांसोबत राहते पण अनेकदा तनाजला भेटायला येते. तनाजनं मोठ्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली पण तिनं छोट्या पडद्यावर काम करणं सोडलं नाही. तिनं अनेक हिट चित्रपट दिले पण छोट्या पडद्यापासून स्वत: ला लांब केलं नाही.