जीवाभावाच्या माणसाकडूनच घात, 'त्या' एका घटनेनंतर बदललं झिनत अमान यांचं रुप, डोळाही गमावला

चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्रीच्या वाट्याला एकाकीपणा   

Updated: Aug 26, 2022, 01:44 PM IST
जीवाभावाच्या माणसाकडूनच घात, 'त्या' एका घटनेनंतर बदललं झिनत अमान यांचं रुप, डोळाही गमावला  title=
actress zeenat aman badly beaten caused her an eye injury

मुंबई : हिंदी चित्रपटांमध्ये 70 च्या दशकात अशा काही अभिनेत्री होत्या, ज्यांनी चौकटीतून बाहेर पडत काही बोल्ड भूमिकाही साकारल्या. (zeenat aman) झिनत अमान हे त्यातलंच एक नाव. सौंदर्याला मादकतेची किनार असणाऱ्या या अभिनेत्रीनं चाहत्यांना जणू वेडच लावलं. 

बोल्ड भूमिकांपासून ते अगदी आव्हानात्मक भूमिकांनाही झिनत अमान यांनी मोठ्या पड्यावर न्याय दिला. पण, त्यांच्या भूमिकांपैक्षा जास्त चर्चा झाली ती म्हणजे खासगी आय़ुष्याची. झिनत अमान यांचं आयुष्य बरंच चढ- उतार दाखवणारं होतं.

जीवनात त्यांनी काही अशा प्रसंगांचा सामना केला, जिथं त्यांना आयुष्यभराच्या वेदनाही सहन कराव्या लागल्या. असं म्हटलं जातं, की झिनत अमान आणि त्या काळचे लोकप्रिय अभिनेते संजय खान यांचं लग्न झालं होतं. पण, संजय यांनी मात्र झिनतसोबत असणाऱ्या वैवाहिक नात्याचा स्वीकार केला नव्हता. 

संजय यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या नात्याची वेगळी बाजू तेव्हा जगासमोर आली, जेव्हा त्यांनी एका पार्टीमध्ये झिनत अमान यांच्यावर हात उगारला होता. पार्टीमध्ये त्या दोघांमध्येही कडाक्याची भांडणं झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार संजय यांनी झिनत अमान यांना इतक्या जोरात चपराक मारली होती, की त्यांच्या डोळ्यालाही यामुळं जबर फटका बसला. (actress zeenat aman badly beaten caused her an eye injury)

झिनत यांना डोळा गमवावा लागला होता. हा आघात सहन करणं त्यांच्यासाठी अतिशय कठीण होतं. एका रात्रीत नाती बदलली होती. त्या घटनेनंतर झिनत आणि संजय विभक्त झाले होते. पुढे झिनत अमान यांनी मजहर खान यांच्याशी लग्न केलं होतं. पण, हे नातं फार काळ टिकलं नाही. प्रदीर्घ आजारपणानं मजहर यांचं निधन झालं. पुढे झिनत यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना स्वबळावर मोठं केलं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x