हनुमान जयंतीच्या निमित्तानं Adipurush सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'हा' लूक पाहून नेटकरी संतप्त

Adipurush Hanuman Poster : हनुमान जयंती निमित्तानं आदिपुरष चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेचं पोस्टर केलं प्रदर्शित. चित्रपटाचं पोस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटकऱ्यांनी क्रिती सेननं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या राग व्यक्त करत कलाकारांना आणि दिग्दर्शकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 6, 2023, 12:21 PM IST
हनुमान जयंतीच्या निमित्तानं Adipurush सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'हा' लूक पाहून नेटकरी संतप्त title=
(Photo Credit : Kriti Sanon Instagram)

Adipurush Hanuman Poster : 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. रामनवमीच्या (Ram Navami) निमित्तानं या चित्रपटाचं एक नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. दरम्यान, अशातच आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti) निमित्तानं बजरंग बली म्हणजेच हनुमानाचं एक पोस्टर आणि ऑडियो शेअर करण्यात आला आहे. हनुमानाचं हे पोस्टर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं नाही. इतकंच काय तर लोकांच्या धार्मिक भावना देखील दुखावत आहेत. सोशल मीडिया नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर 'आदिपुरुष'ला नेटकरी ट्रोल करत आहेत. 

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि आदिपुरूष या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी क्रिती सेनननं (Kriti Sanon) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्टर शेअर केलं आहे. क्रितीनं शेअर केलेलं हनुमानाचं पोस्टर पाहता ही भूमिका अभिनेता देवदत्त नागेनं (Devdatta Gajanan Nage) साकारली आहे. तर या पोस्टरच्या बॅकग्राऊंडला अभिनेता प्रभास हा प्रभु राम चंद्रांच्या भूमिकेत दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत क्रितीनं कॅप्शन दिलं की 'रामाचे भक्त आणि रामकथेचे प्राण, जय पवनपुत्र हनुमान'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

क्रितीनं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये नेटकऱ्यांनी कमेंट करत आदिपुरूष चित्रपटावर विरोध दर्शवला आहे. नेटकऱ्यांनी हनुमानाच्या भूमिकेवर विरोध दर्शवला आहे. त्यांना हे पोस्टर पाहून हनुमानजी आहेत असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. अनेकांनी दिग्दर्शकाचा विरोध केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'लांब दाढी आणि मिशी शिवाय हनुमानजी, हा तर विनोद करण्यात येत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'खरं बोलू तर हे खूप वाईट आहे. पण हे हनुमानजी नाहीत. मौलवी दिसत आहेत.' 

हेही वाचा : Shivali Parab 'या' अभिनेत्यासोबत गेली डेटवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'माझ्या निब्बाबरोबर...',

रामनवमीच्या दिवशी झाले होते ट्रोल

रामनवमीच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलेल्या एका नव्या पोस्टरमुळे मुंबई साकीनाका पोलिस ठाण्यात प्रभास, क्रिती सेनन दिग्दर्शक ओम राउत आणि प्रोड्यूसर भूषण कुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यांनी तक्रार दाखल केली आहे त्यांनी कलाकारांच्या कपड्यांवर आक्षेप दर्शवला आहे. त्यांचं म्हणणे आहे की असं सगळं करत त्यांनी सनातन धर्माचा अपमान केला आहे. तर ज्या व्यक्तीनं तक्रार दाखल केली आहे त्यांचे नाव संजय दीनानाथ तिवारी असं आहे. मुंबई हाईकोर्टचे वकील आशीष राय आणि पंकज मिश्रा यांच्या मदतीनं ही तक्रार दाखल केली होती.