Just Married : आदित्य-श्वेताला किन्नरांनी रस्त्यात अडवल, व्हिडिओ

आदित्य-श्वेता अडकले लग्नबंधनात 

Updated: Dec 2, 2020, 10:06 PM IST
Just Married : आदित्य-श्वेताला किन्नरांनी रस्त्यात अडवल, व्हिडिओ

मुंबई : गायक आणि इंडियन आयडल १२ चे सूत्रसंचालक आदित्य नारायण (Aditya Narayan) १ डिसेंबर रोजी आपल्या लाँग टर्म रिलेशनशिपला लग्न या नात्यात बदललं आहे. सोमवारी आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांच अतिशय धूमधडाक्यात लग्न झालं आहे. 

आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. अशातच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओ या न्यूली मॅरीड कपलला रस्त्यात किन्नरांनी अडवलं आहे. किन्नरांच्या टोळीने या दोघांना घेरलं. किन्नरांनी नवविवाहीत जोडप्याला आशिर्वाद दिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडिओला इंस्टाग्रामवर विरल भयानी यांनी शेअर केला आहे. ज्यामध्ये आदित्य फुलांनी सजलेल्या गाडीत आहे. कार सिग्नलवर थांबते आणि किन्नर तेथे उभे राहतात. गाडीतून आदित्य त्यांना पैसे देतो आणि ते त्याला आशिर्वाद देतात.

प्रसिद्ध गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायणने आपली गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत रोका केला. आदित्यच्या रोका सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.