कार्तिक आर्यननंतर आणखी एक अभिनेता कोरोना संक्रमित

 कार्तिक आर्यननंतर आणखी एका अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.

Updated: Jun 4, 2022, 10:12 PM IST
कार्तिक आर्यननंतर आणखी एक अभिनेता कोरोना संक्रमित  title=

मुंबई : कार्तिक आर्यननंतर आणखी एका अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.  हा अभिनेता दुसरा कोणी नसून आदित्य रॉय कपूर आहे. अभिनेत्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. विशेष बाब म्हणजे स्वत: अभिनेत्याने त्याच्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती शेअर केलेली नाही.

चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम पुढे ढकलला
वृत्तांवर विश्वास ठेवायचा झालं तर, आदित्य रॉय कपूर त्याच्या ओम द बॅटल विदीन चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला उपस्थित राहणार होता. मात्र अभिनेत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ट्रेलर लाँन्चिंग पुन्हा रिशेड्युल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी लवकरच ट्रेलर लाँच करण्याचं आश्वासन दिलं होतं. अशा परिस्थितीत आता या चित्रपटाचा ट्रेलर कधी लाँच होणार हे पाहावं लागेल.

पोस्टरमध्ये मशीनगन घेऊन जाताना दिसला आदित्य 
आदित्य रॉय कपूरने काही दिवसांपूर्वी 'ओम: द बॅटल विदीन' चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केलं होतं. यामध्ये आदित्य हातात बंदूक घेऊन दिसला होता. या चित्रपटात आदित्य संजना संघीसोबत दिसणार आहे. याशिवाय प्रकाश राज, आशुतोष राणा आणि जॅकी श्रॉफ आहेत. कपिल शर्माने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.