मराठमोळ्या दिग्दर्शकाचा 'मुंज्या' गाजवतोय बॉलिवूड; 5 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई

Munjya Box Office Collection: मुंज्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत कोटींची कमाई केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 12, 2024, 05:49 PM IST
 मराठमोळ्या दिग्दर्शकाचा 'मुंज्या' गाजवतोय बॉलिवूड; 5 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई title=
aditya sarpotdar Munjya box office collection day 5 earnings sink after a good start

Munjya Box Office Collection: हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्या बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करतोय. 7 जून रोजी प्रदर्शित झालेल्या मुंज्या हिट ठरतोय. मराठमोळी स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाचा या चित्रपटाची कथादेखील कोकणातील आहे. प्रेक्षकांनीही या हॉरर कॉमेडीचा चांगला प्रतिसाद दिला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत चांगली कमाई केली आहे. चारच दिवसांत मुज्यांने 28.36 कोटींची कमाई केली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. 

मुंज्या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. तर, शरवरी वाघ आणि अभय वर्मा, मोना सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर अनेक मराठी कलाकारांच्यादेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. आता थिएटरमध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका रिपोर्टनुसार, मुंज्याने पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 4 कोटींची कमाई केली आहे. तर, सोमवारीदेखील या चित्रपटाने 4 कोटींचा बिझनेस केला होता. त्याचबरोबर या सिनेमाने आत्तापर्यंत 27 कोटींचा बिझनेस केला आहे. 

चित्रपट प्रदर्शन झाल्यानंतर 4 कोटींचे कलेक्शन केले होते. तर, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 81.25 टक्कांपर्यंत वाढ झाली असून 7.25 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशीदेखील 10.34 टक्क्यांची वाढ झाली तर 8 कोटींची कमाई केली. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून निर्माते व दिग्दर्शक चांगलेच खुश आहेत. 

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, बिट्टू नावाच्या एका मुलाच्या अवतीभोवती या चित्रपटाची कथा फिरते. बिट्टू हा पुण्यात त्याच्या आई व आजीसोबत राहत असतो.एकदिवस चुलत बहिणीच्या साखरपुड्यासाठी म्हणून तो त्याच्या कोकणातील गावी जातो. मात्र तिथे अशा काही घटना घडतात की तो गावातील मुंज्याच्या कचाट्यात सापडतो. त्यानंतर तो मुंज्या बिट्टुच्या मागे लागतो. मुंज्याला लग्न करायचे असते त्यासाठी तो बिट्टुची लहानपणीची मैत्रिण बेलाच्या (शरवरी वाघ) मागे लागतो. बिट्टु आणि बेला मुंज्यापासून पिच्छा कसा सोडवतात हे चित्रपटात दाखवलं आहे. चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान हे आहेत. तर, आदित्य सरपोतदार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

कोकणातील लोककथा आणि निसर्गाचे सौंदर्य याचा पुरेपुर वापर या चित्रपटात केलं आहे. तसंच, कलाकारांचा अभिनयदेखील प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.