मुंबई : 'हिरो नंबर 1' म्हणून हिंदी कलाविश्वात वेगळी ओळख प्रस्थापित करणारा अभिनेता गोविंदा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे त्याने नाकारलेल्या एका ह़लिवू़डपटाचं. 'अवतार' हा प्रचंड गाजलेला आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा चित्रपट आपण नाकारल्याचं सांगत गोविंदाने जणू स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.
नेटकऱ्यांनी त्याच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवातही केली आहे. एका अर्थी गोविंदासुद्धा सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकारच झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. याच ट्रोलिंगमध्ये त्याचे काही विनोदी मीम्स शेअर करत गोविंदाने चूक केल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
If Govinda was offered the lead role of Avatar my dad was offered the lead role of Sholay and declined it as he did not want to work with @aapkadharam . #Govinda #jhootmatbolo pic.twitter.com/M3wDzWHOes
— Anirban (@AskAnirkira) July 29, 2019
Joke of the day... #Govinda pic.twitter.com/PlmkWX2jTF
— George Koruth (@fotobaba) July 30, 2019
#Govinda showing off his expression for #Avatar movie. pic.twitter.com/nfhPHLt3H5
— George Koruth (@fotobaba) July 30, 2019
नुकतच एका टीव्ही शोमध्ये त्याने आपण जेम्स कॅमरुनचा हा चित्रपट नाकारल्याचं सांगितलं. ४१० दिवसांमध्ये चित्रपट पूर्ण करण्यासाठीचा पुरेसा वेळ नसल्याचं कारण देत त्याने हा प्रस्ताव नाकारला होता. हे कारण पाहता, नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवणारे मीम पोस्ट करण्यास सुरुवात केली.
Ok... #Govinda might have suggested #JamesCameron to name the movie #Avatar. I'm ready to accept that as a fact. But I decline to accept that he also offered #Govinda the lead role. No. There is no way I can believe that.
Also: I just can't imagine #Govinda as #Avatar pic.twitter.com/LEd9Yx7Qsg— Trusha Tungare (@trusha_tungare) July 29, 2019
चित्रपट नाकारण्याचं आणखी एक कारण गोविंदाने सांगितल्याचं कळत होतं. ज्यामध्ये अंगावर रंग लावून घेण्यासाठी आपण तयार नसल्याचं त्याने सांगितलं होतं. इतक्यावरच न थांबता जेम्स कॅमरुन यांचा हा चित्रपट साकारण्यासाठी ८-९ वर्षांचा कालावधी लागण्याची भविष्यवाणीही त्याने केली होती. शिवाय चित्रपटाच्या यशाचं भाकितही केलं होतं. गोविंदाने इतक्यावरच न थांबता या चित्रपटाचं नावही आपणच सुचवल्याचं सांगितलं. ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याविषयी व्हायरल होणारे धमाल मीम्स थांबण्याचं नाव घेत नाही आहेत.