लग्नाच्या 22 वर्षांनंतर माधुरीने पतीसाठी उचललं मोठं पाऊल

माधुरी दीक्षितच्या लग्नाला 22 वर्षे झाली आहेत. 

Updated: Oct 17, 2021, 03:23 PM IST
लग्नाच्या 22 वर्षांनंतर माधुरीने पतीसाठी उचललं मोठं पाऊल

मुंबई : माधुरी दीक्षितच्या लग्नाला 22 वर्षे झाली आहेत. तिने 17 ऑक्टोबर 1999 रोजी डॉ श्रीराम नेनेंशी लग्न केले. माधुरी जिथे ग्लॅमर इंडस्ट्रीतील आहे.

दुसरीकडे, श्रीराम नेने प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माधुरीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात दोघांमधील बंधन दिसत आहे. त्यांनी त्यांच्या अनेक जुन्या फोटोंमधून एक व्हिडिओ बनवला आहे. माधुरीने या प्रवासाचे जादुई वर्णकेले.

माधुरीने एक खास व्हिडिओ पोस्ट केला

व्हिडिओची सुरुवात माधुरी आणि श्रीराम नेनेच्या लग्नाच्या थ्रोबॅक फोटोने होते. ज्यात तिने पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे. त्याच्या पुढे रिसेप्शनचे फोटो आहे. इतर काही फोटोंमध्ये ती त्याच्या संपूर्ण कुटुंबासह दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिले - '22 वर्षांचा जादुई प्रवास एकत्र. ' पुढे त्यांनी हार्टचे इमोजी बनवला आहे.