आमिर खान पाठोपाठ आर माधवन कोरोना पॉझिटिव्ह, फरहान, रॅन्चो आणि व्हायरसवर लिहिला गंमतीशीर मॅसेज

आर माधवनने कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे सांगितली

Updated: Mar 25, 2021, 09:48 PM IST
आमिर खान पाठोपाठ आर माधवन कोरोना पॉझिटिव्ह, फरहान, रॅन्चो आणि व्हायरसवर लिहिला गंमतीशीर मॅसेज

मुंबई : एकिकडे कोविड १९च्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे, कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव समोर येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळंत आहे. आमिर खान बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तर गुरुवारी अभिनेता आर माधवनचा कोरोना तपास अहवालही पॉझिटीव्ह आढळला. आर माधवनने स्वत:च्या परिस्थितीला ३ 'इडियट्स' सिनेमाशी जोडत सोशल मीडियावर एक गंमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. त्याचे चाहते त्याच्या या अंदाजाचं जोरदार कौतुक करत आहेत.

यावेळी व्हायरस पकडला
नुकत फरहानने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'फरहानला रांचोचा पाठलाग करायचाच होता आणि व्हायरस नेहमीच आपच्यामागे होता. पण यावेळी व्हायरसने आम्हाला पकडलच. मात्र ऑल ईज वेल आणि कोरोना लवकरच लवकरच नष्ट होईल. ही अशी जागा आहे जिथे आम्ही राजूला येऊ देणार नाही. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. मी बरा होत

आमिर खान आणि आर माधवन 'थ्री इडियट्स' सिनेमातील स्टार होते. या सिनेमांत या दोन पात्रांची नावे रांचो आणि फरहान होती. या सिनेमात या दोघांसोबत अभिनेता शरमन जोशीही 'राजू' च्या भूमिकेत होता. त्याचवेळी 'थ्री इडियट्स'मध्ये अभिनेता बोमन इराणी यांनी व्हायरस ची भूमिका साकारली होती.

चाहते करत आहेत प्रार्थना
ज्याप्रकारे आर माधवनने कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे सांगितली, ते पाहून चाहते त्यांच्या शैलीचं कौतुक करताना दिसत आहेत. या कठीण काळातही त्याने एक मजेदार पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना हसवलं यामुळे, प्रत्येकजण रांचो आणि फरहानच्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.