मुंबई : साऊथ सिनेमांमधील अभिनेता आणि माजी मंत्री अंबरीश यांचे निधन झाले आहे. 24 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अंबरीश हे 66 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर फक्त सिनेजगतच नाही तर राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली आहे.
अंबरीश यांच्या निधनामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. अशातच त्यांच्या एका चाहत्याने आत्महत्या केल्याची गोष्ट समोर आली आहे. अंबरीश यांच्या निधनाची गोष्ट सगळ्यांच्याच मनाला चटका लावणारी आहे.
अंबरीश यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. मात्र त्यांनी उपचारादरम्यानच अखेरचा श्वास घेतला. अनेक दिग्गज मंडळींनी त्यांना श्रद्धांजली व्हायली आहे. रजनीकांत यांनी देखील ट्विट करून श्रद्धांजली व्हायली आहे.
A wonderful human being ... my best friend ... I have lost you today and will miss you ... Rest In Peace #Ambrish
— Rajinikanth (@rajinikanth) November 24, 2018
तसेच साऊथ अभिनेत्री राधिका सरथकुमारने देखील श्रद्धांजली वाहिली. बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच पीएमओ यांनी देखील श्रद्धांजली वाहिली. अंबरीश यांच्या अकाली निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.