close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'बिग बीं'नंतर अदनान सामीचे अकाऊंट हॅक

अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता गायक अदनान सामी यांचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. 

Updated: Jun 11, 2019, 07:07 PM IST
'बिग बीं'नंतर अदनान सामीचे अकाऊंट हॅक

नवी दिल्ली : ट्वीटरवर अकाऊंट हॅक करण्याचा सिलसिला सुरुच आहे. अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता गायक अदनान सामी यांचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. अमिताभ यांच्या अकाऊंट प्रमाणेच सामीच्या अकाऊंटवरही पाकिस्तान पीएम इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला आहे. तुर्कीतील पाकिस्तानी समर्थक ग्रुप अयालडिज टीमने अदनानचे अकाऊंट हॅक केल्याची माहीती समोर येत आहे. अदनानच्या खऱ्या ट्विटर अकाऊंटवर माझे अकाऊंट हॅक करण्यात आल्याचा मेसेज लिहिला आहे. तर दुसऱ्या अकाऊंटवरून देखील अदनाननचे नाव आणि काही पोस्ट ट्वीट करण्यात आल्या आहेत. 

adnan sami twitter account

ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर अदनानने @AdnanSamilive यावर ही माहिती दिली आहे. माझं अकाऊंट हॅक झालं असून मला या अकाऊंटवर संपर्क करा असे आवाहन त्याने फॉलोअर्सना केले आहे. अदनानच्या हॅक्ड अकाऊंटवर इम्रान खान यांचा फोटो असून तुर्कीच्या ग्रुप अयालडिज टीमचा कव्हर फोटो आहे. या अकाऊंटवर वेरिफाइड ब्लू टीकदेखील दिसत आहे.

adnan sami twitter account

'बिग बीं'नाही फटका

अभिनेते अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट सोमवारी हॅक झालं. 'प्रो पाकिस्तान' टर्किश हॅकर ग्रुपकडून त्यांचं अकाऊंट हॅक करण्यात आलं. ज्यानंतर सोशल मीडियावर लगेचच याविषयीच्या चर्चा सुरु झाल्या. बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यांचा प्रोफाईल फोटो बदलून त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं छायाचित्र लावण्यात आलं. शिवाय प्रोफाईल ज्या व्यक्तीचं आहे, त्याविषयी थोडी माहिती देण्यात येण्याच्या भागात 'लव्ह पाकिस्तान', असंही लिहिण्यात आलं. 

ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यावरुन काही ट्विट करण्यात आले. ज्यामध्ये फुटबॉल खेळाचाही उल्लेख करण्यात आला आहे. हा एक मोठा सायबर हल्ला असल्याचं सांगत य़ाच ट्विटच्या माध्यमातून आईसलँडच्या फुटबॉल संघाकडून तुर्कस्थानच्या खेळाडूंना दिलेल्या वागणुकीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.