बिग बॉससाठी काय पण ! अभिनेत्रीने बॉयफ्रेंडला ही सोडलं

सृष्टी हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. 

Updated: Sep 24, 2021, 09:21 AM IST
बिग बॉससाठी काय पण ! अभिनेत्रीने बॉयफ्रेंडला ही सोडलं

मुंबई : टीव्ही अभिनेत्री सृष्टी रोडे 24 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. सृष्टी हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. ती बिग बॉस 12 मध्ये दिसली होती. जेव्हा तिने शोमध्ये प्रवेश केला तेव्हा ती अभिनेता मनीष नागदेवसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण शोमधून बाहेर पडल्यानंतर काही दिवसातच तिचे मनीषसोबत ब्रेकअप झाले.

सृष्टीच्या अचानक ब्रेकअपमुळे मनीषला खूप दुःख झाले. मनीषने सृष्टीवर फसवणूक केल्याचा आरोपही केला होता. अभिनेत्याने लिहिले - 'जे व्हायचे होते ते झाले. प्रत्येकाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. सृष्टीने मला फसवले आहे. तिने माझ्या भावनांशी खेळ केला आहे.

सृष्टीने एका फोन कॉलमध्ये नातं तोडून टाकलं. मी तिला विचारले की आपण दोघे समोरासमोर बोलू शकतो का? प्रतिसादात तिने मला सांगितले की मी माझ्या कारकीर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत मला या नात्यात राहायचे नाही.
 सृष्टी जेव्हा बिग बॉसच्या घरात होती, तेव्हा मी तिचे सोशल मीडिया अकाउंट हाताळले, पीआर पाहिले. माझी मेहनत, नेटवर्क आणि कनेक्शन वापरले.

रोहित सुचातीसोबतची मैत्री बिग बॉसच्या घरात खूप चर्चेत होती. दोघेही प्रेमात असल्याच्या बातम्यांनीही चर्चेत होत्या. बऱ्याच अहवालांमध्ये सृष्टीच्या मनीषसोबतच्या ब्रेकअपचे कारण रोहित असल्याचे मानले जात होते. पण सृष्टी आणि रोहित दोघांनीही हे वृत्त नाकारले होते आणि त्यांच्या नात्याला फक्त मैत्री असे नाव दिले होते.

 

सृष्टीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने 2007 मध्ये Kuchh Is Tara मध्ये काम केले. या शोमध्ये तिचा कॅमिओ होता. यानंतर ती फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत दिसली. यामुळे तिला ओळख मिळाली.