आलिया- रणबीरचीही लगीनघाई

नाते जुळले....

Updated: Oct 29, 2018, 03:27 PM IST
आलिया- रणबीरचीही लगीनघाई

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला रुपेरी पडद्यावरील लाडकी जोडी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नाच्याच चर्चा सुरु आहेत. 

बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे चाहत्यांच्या वर्तुळात प्रचंड आनंद पाहायला मिळत आहे. 

दीपिकामागोमाग आता तिचा बहुचर्चित एक्स बॉयफ्रेंड म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरसुद्धा येत्या कालात विवाहबंधनात अडकण्याची चिन्हं आहेत. 

रणबीर काही महिन्यांपासून अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांनीही जाहीरपणे आपल्या नात्याची कबुलीही दिली आहे. 

इतकच नव्हे तर, आता ते येत्या काळात आपल्या नात्याला एका वेगळ्या वळणावर नेण्याचा निर्णय घेणार असल्याचं कळत आहे. 

आलिया ही रणबीरची अशी प्रेयसी आहे जी संपूर्ण कपूर कुटुंबाच्याच पसंतीस उतरली आहे. 

फक्त रणबीरच नव्हे तर संपूर्ण कपूर कुटुंबालाच आलिया आवडली आहे. सध्या रणबीरची लग्नाचा विचार करत असून, ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच रणबीर त्याच्या लग्नाचा विषय काढणार असल्याची माहिती कपूर कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलियाही लग्नासाठी तयार असून पुढे ती करिअरकडेही तितकच लक्ष देणार आहे. तेव्हा आता बी- टाऊनमधील या आमखी एका बहुप्रतिक्षित लग्नाची तारीख नेमकी कधी जाहीर करणार याचीच उत्सुकता कायम आहे.